Sharad Pawar : शिक्षकांच्या कष्टाची किंमत टप्प्याटप्प्याने का देता? शरद पवार यांचा सवाल

Sharad Pawar : शिक्षकांच्या कष्टाची किंमत टप्प्याटप्प्याने का देता? शरद पवार यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिक्षकांच्या मागण्यांसाठी जितक्या पैशाची गरज असेल, त्याची देण्याची तयारी ठेवा. त्यासाठी आर्थिक तरतूद करा. शिक्षकांवर उद्याची पीढी घडवण्याची जबाबदारी असल्यामुळे त्यांच्या कष्टाची किंमत टप्प्याटप्प्याने का देता? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. दोन दिवसात शिक्षकांच्या मागण्या संदर्भातील निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.



मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या शिक्षकांसोबत त्या ठिकाणी रोहित पवार काल रात्रीपासून मुक्कामी होते. या आंदोलन स्थळी शरद पवार यांनी भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला. राज्य सरकारला शिक्षकांच्या मागण्यांवर जाब विचारताना शरद पवार म्हणाले, शासकीय आणि निम शासकीय कर्मचारी महाराष्ट्राच्या सरकारचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी. शिक्षकांवर इतर सरकारी कामाची देखील जबाबदारी असते. शिक्षकांवर ज्या पद्धतीने जबाबदारी असते, तरी सरकारची देखील त्यांच्या प्रती काही जबाबदारी आहे. शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ नये.

पवार म्हणाले, शिक्षक हे नवी पिढी घडवणारा घटक असून तोच आज पावसामध्ये, चिखलामध्ये इथे बसतो. ही वेळ त्याच्यावर येत आहे. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. मला रोहित पवार यांच्याकडून समजले की, राज्याचे मंत्री इथे येत आहेत. मंत्री येत आहेत, ते ठीक आहे. ते चर्चा करतील आणि प्रश्न सोडवतील. मात्र, प्रश्न अद्याप सुटलेला नाही याचा अर्थ राज्यकर्त्यांना प्रश्न सांगावे लागेल. उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, उद्याची महाराष्ट्राची पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांना संघर्ष करायची वेळ सरकारने येऊ देऊ नये. सरकारवरील ही जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.

शिक्षकांच्या विविध मागण्या संदर्भात आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात आज शालेय शिक्षण मंत्री आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर राज्यातील सर्व शिक्षक आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक देखील आज होणार आहे. या बैठकीमध्ये शिक्षकांच्या विविध मागण्या संदर्भातील प्रश्नांवर चर्चा होणार आहे.

https://youtu.be/X1DipJjJ55o?si=6Ctn8mllCi7pRix4

Why are you paying the price of teachers’ hard work in stages? Sharad Pawar questions

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023