विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक येथील निवडक आयटीआयमध्ये राबवला जाणार आहे. या संस्थांमधून दरवर्षी सुमारे 5000 ते 7000 विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.Chief Minister
बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या कराराअंतर्गत नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था (ECA) एकूण 120 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, महाराष्ट्रातील सहा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केल्या जाणार आहेत.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
विधानभवनात पार पडलेल्या या सामंजस्य कराराच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, बंदरे मंत्री नितेश राणे यांच्यासह अटल सोल्युशन इंटरनॅशनल बी.व्ही. (नेदरलँड्स) चे व्यवस्थापकीय संचालक एडविन सिएसवर्दा, रुरल एन्हान्सन ग्रुपचे अंबर आयदे, कौशल्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, वाढवण बंदर विकास कंपनीचे संचालक उन्मेष वाघ, सागरी मंडळाचे सीईओ पी. प्रदीप आणि व्यवसाय शिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “वाढवणसारख्या प्रकल्पांमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत असून, या करारामुळे तरुणांना आवश्यक प्रशिक्षण मिळेल. कौशल्य विकासाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलनुसार महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. यामुळे राज्यातील तरुणांना केवळ वाढवणच नव्हे तर इतर क्षेत्रांमध्येही रोजगाराच्या संधी निर्माण होतील.”
आयटीआय संस्थांना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा उद्देश असून, हे पाऊल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, स्किल इंडिया मिशन, महाराष्ट्र आयटीआय आधुनिकीकरण धोरण 2025 आणि शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत आहे.
“आयटीआय म्हणजे कौशल्य विकास व्यवस्थेचा कणा आहे. त्यांचे आधुनिकीकरण झाल्यामुळे काळाच्या गरजेनुसार प्रशिक्षण देणे शक्य होईल आणि रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल,” असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले
Modernization of six ITI institutes in Maharashtra, information from the Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी