विशेष प्रतिनिधी
पाटणा : Bihar rally बिहारमध्ये इंडिया ( I.N.D.I.A )आघाडीने निवडणूक यादीतील विशेष फेरसंपादनाविरोधात पुकारलेल्या “बिहार बंद” आंदोलनात काँग्रेस नेते कन्हैया कुमार आणि पुरनियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना राहुल गांधी, तेजस्वी यादव आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत असलेल्या निदर्शन वाहनावर चढण्यास मज्जाव करण्यात आला. या प्रकारामुळे दोघांनाही मोठा अपमान सहन करावा लागला.Bihar rally
या मोर्चात सुरुवातीला सर्व नेते पायी चालत होते. मात्र गर्दी वाढल्यामुळे उघड्या वाहनावरून मोर्चा पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. याच वेळी पप्पू यादव वाहनावर चढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना सुरक्षारक्षकांनी रोखले. काहीजणांनी त्यांना हात देऊन मदतही केली होती, परंतु तरीही त्यांना परत खाली उतरवण्यात आले. त्यानंतर जेव्हा कन्हैया कुमारचा नंबर आला, तेव्हा त्यालाही थांबवण्यात आले आणि मंचावर प्रवेश नाकारण्यात आला.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
या अपमानानंतर भावूक झालेल्या पप्पू यादव यांनी प्रसारमाध्यमांसमोर अश्रू अनावर करत प्रतिक्रिया दिली. कन्हैया कुमारही काही क्षणासाठी वाहनावर चढले होते, पण त्यांनाही खाली उतरवण्यात आले. उपस्थितांनी हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले.
या प्रकारावर सत्ताधारी भाजप आघाडीने जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींसारखे वरिष्ठ नेते पप्पू यादव आणि कन्हैया कुमारसारख्या नेत्यांना योग्य मान देत नाहीत. हे त्यांच्या मानसिकतेचे लक्षण आहे.”
कन्हैया कुमारने नंतर स्पष्टीकरण देताना म्हटले, “ही लढाई सन्मानाची नाही, ही लढाई संविधानाची आणि १४० कोटी जनतेच्या अधिकारांची आहे. राम, शिव आणि अगदी सॉक्रेटिसनेही आयुष्यात संघर्ष केला आहे. त्यामुळे हा अपमानाचा मुद्दा नाही.”
तरीही, “काँग्रेसने आम्हाला निमंत्रणच दिले नसते, तर आम्ही का आलो असतो?” अशी उपरोधिक टीका अनेकांकडून झाली.
जनसुराजचे नव्याने सामील झालेले नेते मनीष कश्यप यांनी म्हटले, “कन्हैया कुमार आमच्या विचारसरणीचा नाही, तरीही त्याचा अपमान झाला याची खंत वाटते. तो प्रतिभावान आहे. पण पप्पू यादव? ते तर काँग्रेसमध्ये जबरदस्तीने सामील होण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण दिलं जात नाही. आणि तरीही स्वतःचा अपमान करून घेतात.”
कश्यप यांनी पुढे म्हटले, “तुम्ही पुरनियातून अपक्ष म्हणून निवडून आलात, पूर आणि आपत्ती काळात चांगलं काम करता. पण १५० किलो वजन घेऊन वाहनावर चढण्याचा प्रयत्न करून स्वतःहून खाली फेकले जाणं योग्य नाही.”
Pappu Yadav and Kanhaiya Kumar insulted at opposition rally in Bihar, prevented from boarding Rahul Gandhi and Tejashwi Yadav’s chariot
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी