विशेष प्रतिनिधी
मुंबई : आकाशवाणी आमदार निवासाच्या उपहारगृहात शिळे अन्न दिल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला मारहाण शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली होती . आता नित्कृष्ट दर्जाचे अन्न दिल्या प्रकरणी उपहारगृहाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्याचा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी मंगळवारी रात्री आकाशवाणी आमदार निवास उपहारगृहातील कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली होती. सोशल माध्यमातून या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारीवरून अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज धाड टाकली. अधिकाऱ्यांनी उपहारगृहाचे स्वयंपाकघर, भांडारघराची सुमारे चार तास तपासणी करून विविध अन्नाचे नमुने घेतले होते. हे खाद्य नमुने परिक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आकाशवाणी आमदार निवास उपहारगृहाचा परवाना निलंबित केला आहे.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी संजय गायवाड यांच्या मारहाणीचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला. दादागिरी करणाऱ्या अशा आमदाराचा बंदोबस्त करण्याची मागणी अनिल परब यांनी केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस संजय गायकवाड यांच्या मारहाणीप्रकरणी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे भूषणावह नाही. यामुळे विधिमंडळाची आणि आमदार म्हणून सगळ्यांची प्रतिष्ठा कमी होते. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी या घटनेची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
उपहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल आमदार संजय गायकवाड यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दात समज दिली आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने रितसर तक्रार करता आली असती. त्यामुळे केलेली मारहाण समर्थनीय नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच संजय गायकवाड यांना आमदार निवास उपहारगृहातील निकृष्ट जेवण खाल्ल्याने उलटी झाली होती. इतरांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी त्वरीत उपहारगृहात धाव घेत अन्नाच्या दर्जाबाबत चौकशी केली. लोकप्रतिनिधी या नात्याने अन्नाच्या दर्जाबाबत रितसर तक्रारी करून त्यावर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते. पण त्यावर मारहाण करणे हा पर्याय असू शकत नाही. संजय गायकवाड यांना समज दिली असून आम्ही याचे समर्थन करत नाही, असेही शिंदे म्हणाले.
License of restaurant at Aakashvani MLA residence suspended
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी