Sanjay Shirsat : समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

Sanjay Shirsat : समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली असल्याची कबुली स्वतः संजय शिरसाट यांनी दिली आहे. ही नोटीस कोणत्या प्रकरणासाठी देण्यात आली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. Sanjay Shirsat

गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आले आहेत. विट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेवर विरोधी पक्षाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानतंर संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत आणि पत्नी विजया यांची भागिदारी असणाऱ्या मद्य कारखान्यासाठी एमआयडीसीने आरक्षण बदलण्याचा आरोप झाला.

समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात चार्टर्ड अकाऊंटंट् (सीए) यांच्या कार्यक्रमात मंत्री शिरसाट यांनी या नोटीशीची जाहीर कबुली दिली. ते म्हणाले की, आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाही. हे मी माझ्यासाठीच बोललो आहे. परवाच मला आयकर विभागाची नोटीस आली आहे. तुमची मालमत्ता एवढी कशी वाढली याची विचारणा त्यामध्ये करण्यात आली आहे. 2019 मध्ये तुम्ही दाखल केलेल्या निवडणूक शपथपत्रात जाहीर केलेली मालमत्ता एवढी होती आणि 2024 मध्ये एवढी कशी वाढली, याची विचारणा आयकर विभागाने केली आहे. त्यासाठी येत्या 9 तारखेपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.



मंत्री संजय शिरसाट यांनी नोटीस आल्याचे मान्य केले आहे. ते म्हणाले की, काही लोकांनी तक्रार केली होती. तक्रारीची दखल आयकर विभागाने घेतली आणि 9 तारखेची वेळ दिली होती. आम्ही वेळ वाढवून मागितली आहे. आयकर विभागाला कायदेशीर उत्तर देऊ, असे त्यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे (छत्रपती संभाजीनगर) माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आयकर विभागाकडे मंत्री शिरसाट यांची तक्रार केली होती. संजय शिरसाट यांनी 2019 आणि 2024 विधानसभा निवडणुकीत दाखल केलेले शपथपत्रामध्ये त्यांच्या संपत्ती आणि मालमत्तेचा उल्लेख आहे. या दोन निवडणुकीच्या काळात त्यांच्या संपत्तीमध्ये एवढी वाढ कशी झाली याची तक्रार इम्तियाज जलील यांनी आयकरविभागात केली होती. याच प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

मंत्री संजय शिरसाट यांनी विट्स हॉटेलच्या लिलावात सहभाग घेतल्यापासून त्यांच्या संपत्तीची चर्चा सुरु झाली आहे. 110 कोटींची हॉटेल त्यांचा मुलगा सिद्धांत याने फक्त 67 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले होते. मात्र विरोधकांनी आरोप केल्यानंतर लिलावाच्या पुढील प्रक्रियेतून शिरसाट बाहेर पडले. या लिलाव प्रक्रियेची उच्चस्तरीय समितीकडून चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिले आहेत.
समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांची गेल्या पाच वर्षांमध्ये 13 टक्क्यांनी संपत्ती वाढली असल्याचे त्यांच्या निवडणूक शपथपत्रातून समोर आले आहे.
2019 मध्ये 1.21 कोटी जंगम मालमत्ता होती. त्यात 2024 मध्ये वाढ होऊन 13.37 कोटी झाली. तर स्थावर मालमत्ता 1.24 कोटी होती त्यात 2024 मध्ये वाढ होऊन 19.65 कोटी झाली. त्यांच्या ठेवींमध्ये या पाच वर्षांमध्ये 76 लाखांची वाढ झाली आहे. 2019 मध्ये 5 लाखांच्या ठेवी होत्यात 2024 मध्ये 81 लाखांच्या ठेवी आहेत.

Income Tax Department issues notice to Social Welfare Minister Sanjay Shirsat

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023