विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Gaikwad शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 352 अपमानित करणे, 115(2), मारहाण करणे , 3(5), संगनमत करून मारणे या कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अदखलपात्र गुन्ह्यांची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवली जाणार आहे. समाज माध्यमांमधील व्हिडीओ आणि स्थानिकांकडे केलेल्या चौकशीच्या आधारे या दखलपात्र गुन्ह्यांची नोंद केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.Sanjay Gaikwad
आपल्याला शिळं अन्न दिलं म्हणून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास कँन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्या संबंधी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी जर गुन्हा दाखल झाला तर त्याला सामोरं जाणार असल्याची प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली होती.
आमदार गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये जेवणं मागवलं. वरण आणि भाताचा पहिला घास खाल्यावरच त्यांना ते खराब असल्याचं लक्षात आलं. त्याच संतापात त्यांनी खाली कॅन्टिनमध्ये जात ‘मला विष खायला घालतो का’ असं विचारल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. प्लास्टिकच्या पिशवीत पार्सल केलेल्या डाळीला वास येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचा वास घ्यायला लावला आणि जबर मारहाण केली.
मी कुठलाही मोठा गुन्हा केलेला नाही मी चांगल्या गोष्टीसाठी सौम्य मारहाण केली आणि चांगल्या गोष्टीसाठी कितीही माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी आय डोन्ट केअर असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलं होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करताना पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. पोलीस याची चौकशी करतील. यासाठी कुणाचीही तक्रार येण्याची गरज नाही. दखलपात्र गुन्हा असेल तर पोलीस त्याची चौकशी करतील. चौकशीसाठी कुणी तक्रार करावी असं नाही. पोलिस स्वत: चौकशी करू शकतात असं सांगितलं होतं.
Case registered against Sanjay Gaikwad in connection with assault in MLA’s canteen
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार