विशेष प्रतिनिधी
मुंबई : कम्युनिस्टांविरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या संघर्षाचा संदर्भ देत भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक झाले. त्यांनी या विधेयकाला विरोध करत सभात्याग केला.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत आज जनसुरक्षा विधेयक मांडले. या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाल्यानंतर प्रसाद लाड यांनी आपले मत मांडले. त्यांनी जनसुरक्षा विधेयकावर बोलताना म्हटले की, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही विचारधारा मारून शिवसेना स्थापन केली होती. त्यांच्या या वाक्याला शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनी कडाडून विरोध केला. बाळासाहेबांनी विचारधारा मारून म्हणजे कोणती विचारधारा मारली, असा सवाल दानवेंनी केला. त्यावर लाड यांनी 1966 चा इतिहास काढून पाहा असे उत्तर दिले. यावरून सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे सत्ताधारी आणि विरोधकांना शांत करत अंबादास दानवे यांनी बोलण्याची संधी दिली.
अंबादास दानवे म्हणाले की, माझा मुद्दा एवढाच आहे की, याचं पोटातलं ओठावर येत आहे. ते असं बोललं की, शिवसेना प्रमुखांनी ज्या विचारसरणीला मारलं. शिवसेना प्रमुखांनी मारलं म्हणजे याचं अर्थ त्यांच्या विचारणीविरुद्ध हे विधेयक आहे का? आपण नक्षलांविरोधात बोलत आहोत की वेगळ्या विषयावर बोलत आहोत. प्रसाद लाड कोणत्या विषयावर बोलत आहेत? हा माझा मुद्दा आहे. ते काहीही बोलणार का? शिवसेना प्रमुखांनी या विचारणीला मारलं, मला त्यांना विचारायचं आहे की, नक्की कोणत्या विचारणीला मारलं? नक्षलांविरोधात हे विधेयक आहे ना? असा प्रश्न उपस्थित करत अंबादास दानवे यांनी आमचा या विधेयकाला विरोध असल्याचे म्हणत सभात्याग केला.
त्यांच्यासोबत इतर विरोधकही सभागृहाच्या बाहेर पडले. सभागृहात झालेल्या गोंधळामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी 10 मिनिटांसाठी सभागृहाचं कामकाज थांबवण्यात आलं होतं. यानंतर सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली. प्रसाद लाड यांनी जनसुरक्षा विधेयकांवर आपलं मत मांडलं. त्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक पास करावं, अशी मागणी केली. विरोधकांनी सभात्याग केला होता, मात्र त्यानंतरही जनसुरक्षा विधेयक विधानसभेनंतर विधान परिषदेत मंजूर झालं.
Opposition creates ruckus in Legislative Council due to mention of Shiv Sena chief Balasaheb Thackeray
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार