जयंत पाटील यांचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष

जयंत पाटील यांचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी पक्षाने शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. ते येत्या 15 जुलै रोजी जयंत पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारतील अशी माहिती आहे. Jayant Patil

राष्ट्रवादी काँग्रेसचा 10 जून रोजी वर्धापन दिन साजरा झाला होता. त्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. शरद पवारांनी मला अनेक वर्षे संधी दिली. तब्बल 7 वर्षांचा कालावधी दिला. पण आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे. त्यामुळे मी सर्वांसमोर मला मदमुक्त करण्याची विनंती करत आहे. शेवटी हा पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यांनी या प्रकरणी योग्य तो निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतरच राजकीय वर्तुळात ते कोणत्याही वेळी प्रदेशाध्यक्ष पद सोडतील असे मानले जात होते. त्यानुसार आज त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

अजित पवार भाजपसोबत गेल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले. मात्र, याचा फायदा घेत शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी राजकारणातील हालचाली वाढवायला सुरुवात केली होती. लोकसभा निवडणुकीत देखील आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रचार करून अनेक उमेदवारांच्या विजयात आपला देखील वाट असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे रोहित पवार यांचे पक्षातील महत्त्व वाढत आहे. त्यातच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये संघर्ष दिसून आला.

मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा दारुण पराभव झाल्यानंतर शरद पवार गटातील अंतर्गत राजकारण पुन्हा काढून आले होते. रोहित पवार यांच्यामुळे आपल्याला काम करता येत नाही अशी तक्रार जयंत पाटील करत होते.

Jayant Patil resigns, Shashikant Shinde becomes new state president of NCP Sharad Pawar group

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023