विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पूर्णतः खोडसाळपणाचे असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार तथा मुख्य प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. Jayant Patil
जयंत पाटलांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची बातमी शनिवारी सकाळी मराठी वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाली होती . या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी उपरोक्त स्पष्टोक्ती दिली आहे. जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो, असे आव्हाड यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा 10 जून रोजी वर्धापन दिन साजरा झाला होता. त्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी आज शरद पवारांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाने त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. ते येत्या मंगळवारी जयंत पाटलांकडून सूत्रे सांभाळतील, असा दावा वृत्तवाहिन्यांनी केला होता. पण आव्हाड यांनी त्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. त्यावेळी अनेक नेते या पदाच्या शर्यतीत होते. धनंजय मुंडे, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील आदी नेत्यांची नावे या प्रकरणी चर्चेत होती. पण अखेर जयंत पाटील यांची निवड झाली. राज्यात त्यावेळी भाजपची सत्ता होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांच्यासमोर पक्षसंघटनेच्या बांधणीचे मोठे आव्हान उभे होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अचानक राजकीय समिकरणे बदलली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली. पण तत्पूर्वी अजित पवारांनी पक्षात अपयशी बंड केले आणि जयंत पाटील यांना पक्षावरील आपली पकड अधिक घट्ट करण्याची संधी मिळाली. याचवेळी शरद पवारांचे अतिशय विश्वासू नेते म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली होती.
Jayant Patil is the state president, Jitendra Awhad claims that the news of his resignation is a hoax
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार