विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : आतापर्यंत 350 गुन्हे दाखल आहेत आणखी गुन्हे दाखल झाल्याने काही मरणार नाही. जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत लढत राहणार आहे. जो बँक अधिकारी वसुलीला येईल त्याला ठोकून काढू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला.
आत्महत्या केलेले शेतकरी साहेबराव करपे यांच्या चिलगव्हाण गावात 7/12 कोरा यात्रेत ती बोलत होते. ते म्हणाले, साहेबराव करपे यांच्या बलिदानाच्या रणभूमीस नतमस्तक होत, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा हा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यात्रेने केला. शेतकऱ्यांचे मरण थांबले पाहिजे, त्याची आत्महत्या थांबली पाहिजे, एवढ्यासाठीच ही यात्रा आहे. मी मरेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे.
बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (ठाकरे) मनसे, यांच्या नेत्यांनीही हजेरी लावली. मनसेचे बाळा नांदगावकर 10 जुलै रोजी दारव्हा तालुक्यातील लाखखिंड येथे बच्चू कडू यांच्या यात्रेत सहभागी झाले. अंबोडा येथील समारोप सभेला शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील उपस्थित होते.
रोहित पाटील म्हणाले की शेतीबद्दल काहीही कळत नसलेले लोक सत्तेवर बसले आहेत.
Will Beat Up Recovery Agents Warns Bachchu Kadu
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार