विशेष प्रतिनिधी
मुंबई : जगातील प्रसिद्ध टेस्ला कंपनीनेही आता भारतात ईव्ही ( EV) कारचे लान्चिंग केले आहे. टेस्ला ईव्ही कारच्या भारतातील पहिल्या शो रुमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये टेस्ला ईव्ही कारचे शो रुम सुरु करण्यात आले आहे.
टेस्ला कार शोरुमच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही टेस्लाच्या भारतातील आगमनाची वाट पाहात होतो. टेस्लाने भारतातील त्यांच्या व्यवसायाची सुरुवात मुंबई आणि महाराष्ट्रातून केली याचा आम्हाला विशेष आनंद आहे. टेस्ला कारचे मुंबईत फक्त शो रुम असणार नाही तर टेस्ला मुंबईमध्ये एक्स्पिरियन्स सेंटर, त्यासोबतच डिलिव्हरीची व्यवस्था, लॉजिस्टिक्स आणि सर्व्हिसिंगचीही व्यवस्था उपलब्ध करुन देत आहे. टेस्लाने महाराष्ट्र आणि मुंबईची निवड केली ही आमच्यासाठी सर्वाधिक आनंदची बाब आहे. महाराष्ट्र आज इलेक्ट्रिक वाहन(ईव्ही) क्षेत्राचे नेतृत्व करत आहे. मला विश्वास आहे की आगामी काळात टेस्लाचे पूर्ण इको-सिस्टिम ही महाराष्ट्रात पाहायला मिळेल.
महाराष्ट्रातील रस्त्यांवर टेस्लाची कार चालणार का, या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व रस्ते हे जागतिक दर्जाच्या मानकांनुसार बांधण्यात आले आहेत. टेस्लाच्या कार महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
गेल्या काही महिन्यात टेस्लाने भारतात 10 लाख डॉलर्सहून अधिक इलेक्ट्रिक वाहने, चार्जर्स आणि एक्सेसरीज इंपोर्ट केले आहेत. अमेरिका आणि चीनमधून हे सर्व आयात करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये टेस्लाची सर्वाधिक प्रसिद्ध वाय (Y) मॉडेलच्या सहा कारचा समावेश आहे. मुंबईत टेस्लाचे शो रुम सुरु झाल्यानंतर टेस्ला त्यांचे प्रसिद्ध मॉडेल -Y येथे उपलब्ध करुन देणार.
टेस्लाची मॉडेल-Y कार ही कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कॉसओव्हर एसयूव्ही आहे. दिसायला ही कार रुबाबदार आहेच त्यासोबतच या कारचे फिचर देखील अत्याधुनिक आहेत. या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 27 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. वास्तविक ही किंमत इंपोर्ट ड्यूटीशिवाय आहे. आयात शुल्क आणि इतर कर जोडून या कारवर 21 लाख रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत. ग्राहकांना मॉडेल-Y कारसाठी भारतामध्ये 48 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
कंपनीने वेबसाईटवर भारतातील किंमतींच्या दिलेल्या माहितीनुसार 60 लाखांपासून कारची किंमत सुरु होते.या मॉडेलच्या रिअर-व्हिल ड्राइव्हची किंमत 59.89 लाख रुपये सांगितली जात आहे. या कारची ऑन रोड प्राइज 61.7 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. रेड व्हेरिएंट मधील लाँग रेंज रिअर-व्हिल ड्राइव्हची किंमत 68.14 लाख रुपये आहे या मॉडेलची ऑन रोड प्राइज 71.02 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
https://www.facebook.com/share/v/16W3XrvzgM/
Tesla in India, CM inaugurates first showroom in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला