विशेष प्रतिनिधी
मुंबई : १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटांना थांबवता आले असते. पण अभिनेता संजय दत्तची एक चूक नांदली. संजय दत्तने ज्या कारमधून एके-४७ बंदूक उचलली होती, त्या कारबद्दल पोलिसांना सांगितलं असते, तर हे स्फोट कधीच झाले नसते, असे वक्तव्य ज्येष्ठ वकील आणि नूतन खासदार उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निकम (Ujjwal Nikam) म्हणाले, “बॉम्बस्फोटांच्या काही दिवस आधी, दाऊद इब्राहिमसाठी काम करणारा अबू सालेम हा शस्त्रांनी भरलेली व्हॅन घेऊन संजय दत्तच्या घरी आला होता. त्यात हँडग्रेनेड आणि एके-४७ होती. संजय दत्तने त्यातून काही वस्तू घेतल्या आणि नंतर त्या परत केल्या. पण, एके-४७ स्वत:कडे ठेवून घेतली. याबद्दल पोलिसांनी माहिती न देणे हे स्फोटांचे कारण बनले. ज्यात अनेक लोक मृत्यूमुखी पडले. संजय दत्त निर्दोष होता, त्याला शस्त्रांची आवड असल्यानेच बंदूक ठेवली होती. कायद्याच्या दृष्टीने त्याने गुन्हा केला, पण तो एक साधा माणूस आहे. संजय दत्तकडे एके-४७ होती मात्र त्याने कधीही बंदूक चालवली नाही. परंतु, पोलिसांना त्याबद्दल माहिती न देणे हेच इतक्या लोकांच्या मृत्यूचे कारण होते.
“न्यायालयाने संजय दत्तला दहशतवादी आणि विध्वंसक क्रियाकलाप कायद्याअंतर्गत ( TADA ) दहशतवादी असल्यापासून मुक्त केले होते. तथापि, त्याला शस्त्र कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. कारण, बंदी असलेले शस्त्र एके-४७ त्याच्याकडे होते. नंतर, सर्वोच्च न्यायालयाने त्याची सहा वर्षांची शिक्षा कमी करून पाच वर्षांची केली होती, असे सांगून निकम म्हणाले, शिक्षा सुनावल्यावर संजय दत्तचा रागावरील ताबा सुटला होता. मी त्याचे भाव बदलताना पाहिले. मला वाटले की, त्याला धक्का बसला आहे. तो निकाल सहन करून शकला नाही आणि थरथर कापत होता. तो कचेरीत होता आणि मी जवळच होता. मी त्याला सांगितलं की, ‘संजय असे करू नको. मीडिया तुम्हाला पाहत आहे. जर तुम्ही घाबरलेले दिसलात तर लोक तुम्हाला दोषी मानतील. तुम्हाला अपील करण्याची संधी आहे. यावर तो म्हणाला, ‘हो सर, हो सर…’”
Actor Sanjay Dutt’s mistake behind Mumbai bomb blasts! MP Ujjwal Nikam tells the story
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला