Eknath Shinde : सहकाऱ्यांना घरगडी समजू लागले आणि मग तिथेच गाडी फसली…एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Eknath Shinde : सहकाऱ्यांना घरगडी समजू लागले आणि मग तिथेच गाडी फसली…एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की सहकाऱ्यांना सवंगडी समजायचं. पण काही लोक त्यांना घरगडी समजू लागले आणि मग तिथेच गाडी फसली, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.


मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेसोबत युती केली आहे. युतीची घोषणा झाल्यावर ते म्हणाले, शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत. या सेना रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत. बाळासाहेबांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. त्यामुळे आमचं एकदम चांगलं जमेल.

आपले कार्यकर्ते हे आपले सहकारी आहेत. त्यांच्या जीवावर पक्ष मोठा होतो. कार्यकर्ता मजबूत आहे म्हणजे पक्ष मजबूत आहे. आता दोघं एकत्र आलो आहे. त्यामुळे कार्यकर्ता नेत्याला मोठं करतो. कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होतो. सर्व निवडणुका जिंकून देतो. पण जेव्हा काही लहान मदत लागते तेव्हा त्या नेत्याने खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं, अशी अपेक्षा एकनाथ शिंदें यांनी व्यक्त केली.

आनंदराज आंबेडकर हे माझ्यासारखेच सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. त्यांनाही वारसा मोठा आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेणारे ते भारतीय होते. साधी राहणी उच्च विचारसरणी हे त्यांनी पाळलं. सत्तेत गेल्यावर जनतेची सेवा करता येते. सत्ता जनतेसाठी राबावायची असते. शिवशक्ती आणि भीमशक्ती ही कार्यकर्त्यांची फौज असलेली सेना आहे. तुमची सेना रिपब्लिकन सेना आणि आमची सेना शिवसेना आहे. तुमच्याही पक्षात आणि आमच्याही पक्षात कोणी मालक किंवा कोणी नोकर नाही. सर्वजण कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री असताना सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून काम केलं. आता देवेंद्र फडणवीस हे सीएम आहेत आणि मी डीसीएस आहे म्हणजे डिडेकेटेड टू कॉमन मॅन आहे. शेवटी सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हीच आपली सामाजिक बांधिलकी आहे. त्यामुळे तळागाळातील माणसाशी नाळ तुटता कामा नये हे नेहमी पाळण्याचे पथ्य आपण केलं. आनंदराज आंबेडकर यांना बाबासाहेबांचे रक्ताच्या वारसा आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे सर्वसामान्य माणूस उच्च पदावर पोहोचू शकला. यात मी सांगेन की तुमचा एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री झाला”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

When He Started Thinking Colleagues Like Servants, That’s Where It All Fell Apart”: Eknath Shinde’s Jibe at Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023