विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभा अधिवेशन सुरू असताना धमकीचा मेसेज आला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी ही धमकी दिली असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. यासंदर्भात आव्हाड यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत माहिती दिली आहे. ( Threatening message to Sharad Pawar group leader Jitendra Awhad)
या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. ज्या क्रमांकावरून हा मेसेज आला तो क्रमांक देखील आव्हाड यांनी जाहीर केला आहे. हा मेसेज मला आता विधानसभा सुरू असताना आला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इतकेच नाही तर सदरील मेसेज हा अमर कोळी नावाच्या व्यक्तीने पाठवला असून त्याचा गोपीचंद पडळकर यांच्या सोबतचा फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आता विधानसभा अध्यक्ष त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. Jitendra Awhad
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
विधानभवनाच्या गेटवर बुधवारी भाजपचे आक्रमक आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात थेट राडा झाला. रस्त्यावरच्या भांडणाला साजेल असा प्रकार राजकीय नेत्यांकडून घडला होता. पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप आव्हाडांनी केला होता. त्यासाठी या दोघांमधील वाद उफाळून आला आणि शब्दांपेक्षा शिव्यांचा भडिमार सुरू झाला होता. माध्यमांना आव्हाड म्हणाले की, हा काय बालीशपणा आहे? दरवाजाला लाथ मारली, ती मला लागली. कोणाच्या अंगावर गाडी घालायची, ही काय परंपरा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या आधी देखील असेच झाले होते. जाणूनबुजून त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. एवढा राग का येतो? आम्हाला का डिवचायचं? या प्रकरणावर आता विधानसभा अध्यक्ष व मुख्यमंत्री काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. काही दिवसांपूर्वी पडळकर यांना उद्देशून आव्हाड विधानभवन गेटजवळच ‘मंगळसूत्र चोर’ असे ओरडले होते. त्यामुळेच हा सर्व प्रकार घडल्याची चर्चा सुरु होती.
Threatening message to Sharad Pawar group leader Jitendra Awhad
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला