विशेष प्रतिनिधी
मुंबई : आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विधानभवनात एकमेकांना भिडले. यामुळे विधानभवनातील वातावरण तापले होते. विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी. यासंदर्भात कडक कारवाई अध्यक्षांनी करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “घडलेली घटना चुकीची आहे. अशाप्रकारचे इथे घटना येथे घडणे योग्य नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्याअंतर्गत हा परिसर येतो. त्यामुळे अध्यक्ष आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी. यासंदर्भात कडक कारवाई अध्यक्षांनी करावी, अशी मी विनंती केली आहे. एकतर मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे विधानसभेला शोभत नाही. त्यामुळे निश्चित कारवाई झाली पाहिजे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, जर तुम्ही विधानभवनात गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचे जीव सुरक्षित नाहीत. मी स्वत: ट्विट केले आहे. मला आया बहिणींवरून शिवीगाळ करण्यात आली. विधानसभेत काय चालू आहे? हे सगळे मलाच मारण्यासाठी आले होते.”
“विधिमंडळाच्या आवारात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला आमदार राहायचे? आमचा काय गुन्हा आहे? कुणीतरी मवाल्यासारखा येतो आणि आमच्या आय बहिणीवरून शिव्या देतो. याला अधिकृत भाषा म्हणून जाहीर करा. असंसदीय शब्द वापरले जातात. त्याला संसदीय शब्द म्हणून जाहीर करा. सत्तेचा एवढा माज आणि मुजोरपणा?” असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.
बुधवारी गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ केली होती. यानंतर आव्हाड यांना धमकी दिली जात असल्याचं समोर आले होते. आता पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची चर्चा होती. यावेळी विधानभवनातील सुरक्षारक्षकांनी दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला केले. त्यामुळे विधानभवनातील वातावरण काही काळ तापलं होतं.
भाजपचे आमदार संजय उपाध्याय विधानसभेत मुद्दा उपस्थित करताना म्हणाले की, “काही गुंडांनी आपसात मारामारी केली. मला जे काही समजले त्यात गोपीचंद पडळकर यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. विधानभवनात आमदारांवर हल्ला होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.”
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे विधानसभेत म्हणाले की, “विधानभवनात आमदार हा महत्त्वाचा असतो. पण, काही लोकं बाहेरून येऊन जे आमदार वगैरे कोणी नाही, त्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केली. कोणी हाणामारी केली? त्याचा शोध घ्यावा आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी.” अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार सना मलिक यांनीही महिला आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. याला मंत्री आशिष शेलार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, “गृहराज्य मंत्री यांनी आमदारांनी मांडलेल्या मुद्द्याची दखल घेतली आहे.”
Awhad and Padalkar’s activists clashed with each other in the Vidhan Bhavan itself.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला