विशेष प्रतिनिधी
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये आल्याने चर्चांना उधाण आले आहे. Devendra Fadnavis
मुंबई उपनगरातील सॉफिटेल हॉटेलमध्ये हे दोन्ही नेते एकत्र आल्याची माहिती समोर आल्यानंतर या दोघांची भेट झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली. दरम्यान, दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये गेले असले तरी ते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी त्या हॉटेलमध्ये आले होते . दोन्ही नेत्यांची भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण भाजपच्या सूत्रांनी दिले.
मागील तीन दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये भेटीगाठीचा सिलसिला वाढला आहे. विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना सभागृहात बोलताना मिश्किलपणे सोबत येण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली होती.
त्यानंतर आज आदित्य ठाकरे हे सायंकाळी पावणे सहा वाजेपासून सॉफिटेल हॉटेलमध्ये होते. काही वेळानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याठिकाणी दाखल झाले होते. पण हे दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आले होते. तसेच त्यांची भेट झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र वृत्तवाहिन्यांनी त्यापूर्वी दोघांची भेट झाल्याचे वृत्त दिले. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना दिली होती ऑफर
यापूर्वी विधान परिषदेतील भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती. “उद्धवजी, 2029 पर्यंत काही स्कोप नाही. आम्हाला विरोधी बाकांवर यायचा स्कोप नाही. तुम्हाला इकडे यायचे असेल तर स्कोप आहे, ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू,” असे त्यांनी सांगितले होते. तसेच, “उद्धव ठाकरे यांचा पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे,” असेही ते म्हणाले.
फडणवीसांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी कोणताही स्पष्ट संकेत न देता, खेळीमेळीचा सूर कायम ठेवला. “सभागृहात या गोष्टी खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला हव्यात,” अशी प्रतिक्रिया देत त्यांनी चर्चेची दारे बंद केली नाहीत, हेही तितकेच महत्त्वाचे.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनात उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची प्रत्यक्ष भेटही नुकतीच झाली होती. या भेटीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले होते, “उद्धवजींनी ‘हिंदी सक्ती हवीच कशाला’ या लेखसंग्रहाचे पुस्तक दिले. कुणी कुणाला भेटले म्हणजे लगेच युती झाली, असे नसते.”
Devendra Fadnavis and Thackeray group MLA Aditya Thackeray visiting the same hotel sparks controversy
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला