विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raju Shetty महाराष्ट्रात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायेत आणि कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत यांना लाजा कशा वाटत नाही अशा शब्दात माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विधानसभा अधिवेशनातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात बसून कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.Raju Shetty
राजू शेट्टी म्हणाले की, कृषिमंत्री किती बेजबाबदार आहेत याचे हे उदाहरण आहे परंतु हे पहिले नाही. याच कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्यासोबत केली. शेतकरी कर्जमाफीचा पैसा लग्नात, साखरपुड्यात उधळतात असे बोलले आणि आता हा माणूस विधानसभा सभागृहात रमी खेळत असेल तर त्यांची तुलना कुणासोबत करायची, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना अशी माणसं चालतातच कशी? या महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाला आहे. दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या करतायेत. यांना लाज कशी वाटत नाही ?Raju Shetty
इथे कंपन्या शेतकऱ्यांना खते द्यायला तयार नाहीत. न खपणारा माल शेतकऱ्यांच्या हाती मारला जातो. किटकनाशके, बियाणे बोगस निघालेत. ज्यांनी पेरणी केली त्यांची बियाणे बोगस निघालेत. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले असेल. या परिस्थितीत कृषिमंत्री रमी खेळत असेल तर त्याला काय बोलायचे, अजितदादांना कळायला हवे. या मंत्र्याच्या बुडावर लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातून हाकललं पाहिजे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत कृषिमंत्री विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळताना दिसतात. यावर रोहित पवार म्हणतात की, सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला ‘पिकविमा-कर्जमाफी-भावांतर’ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा टोला लगावला आहे.
Eight farmers commit suicide every day and the Agriculture Minister is playing rummy in the Assembly, Raju Shetty’s angry
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये आल्याने चर्चांना उधाण
- ते राजकारणाच्या कचराकुंडीत, सोबत जाईल तोही संपेल, मनोज तिवारी यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
- Vijay Wadettiwar : शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा
- Nitesh Rane : खरा शकुनी मामा मातोश्रीवर, राज ठाकरे यांच्या सभेवरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा