विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात सुप्रीम कोर्टाने प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रौशन सिन्हा ऊर्फ @MrSinha_ यांना अटकेपासून दिलासा दिला आहे. १७ जुलै २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा पोलिसांना त्यांच्या अटकेवर तात्पुरती स्थगिती देत, कोर्टाच्या परवानगीशिवाय अटक न करण्याचे आदेश दिले. Raushan Sinha
या प्रकरणात तेलंगणा सरकारने २०२४ मध्ये एफआयआर दाखल केला होता. एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ३५२, ३५३(२), ३५३(१)(क) आणि ३३६(४) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. काँग्रेसशी संबंधित तक्रारदारांनी राहुल गांधींच्या एका फोटोसह रौशन सिन्हा यांनी टाकलेल्या ट्विटला भडकावणारा ठरवून तक्रार दाखल केली होती.
एफआयआरनंतर हैदराबादच्या सायबर क्राईम पोलिसांच्या पथकाने रौशन सिन्हा यांच्या घरी पोहोचून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तत्पूर्वीच त्यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तिथे दिलासा न मिळाल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल केली.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि ऑगस्टीन जॉर्ज मशीह यांच्या खंडपीठाने रौशन सिन्हा यांना दिलासा देत सांगितले की, त्यांना पुढील आदेशांपर्यंत अटक करता येणार नाही. मात्र, त्यांनी तपास अधिकाऱ्यांसमोर २५ जुलै रोजी हजर राहणे बंधनकारक असेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी पंधरा दिवसांनंतर घेण्यात येणार आहे.
सिन्हा यांनी याबाबतची माहिती स्वतः आपल्या X हँडलवरून शेअर केली असून, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की, “दबावाच्या परिस्थितीत सत्य बोलणाऱ्यांना धमकावले जात आहे. पण शेवटी न्यायव्यवस्थाच सत्याचा विजय घडवते.”
हा निर्णय स्वतंत्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. रौशन सिन्हा हे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेले प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या पोस्ट्समुळे अनेकदा चर्चेला सुरुवात होते. यामुळेच त्यांच्यावर राजकीय हेतूंनी प्रेरित कारवाई झाल्याचा आरोप भाजप आणि इतर समर्थनार्थ गटांनी केला होता.
दरम्यान, तेलंगणा सरकारकडून या प्रकरणात कोणतेही राजकीय द्वेष नसल्याचा दावा करण्यात आला असून, हे प्रकरण भडकाऊ भाष्य आणि समाजात तेढ निर्माण करण्याच्या संभाव्य धोका यावर आधारित असल्याचे सांगण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे सोशल मीडियावर वैचारिक मते मांडणाऱ्या नागरिकांना एक महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया अनेक नेटिझन्स आणि कायदेतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
Raushan Sinha protected from arrest, court gives a blow to Telangana government for posting on social media about Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये आल्याने चर्चांना उधाण
- ते राजकारणाच्या कचराकुंडीत, सोबत जाईल तोही संपेल, मनोज तिवारी यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
- Vijay Wadettiwar : शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा
- Nitesh Rane : खरा शकुनी मामा मातोश्रीवर, राज ठाकरे यांच्या सभेवरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा