विशेष प्रतिनिधी
मुंबई : सभागृहात बारच्या प्रकरणात संतापलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर हक्कभंग आणणार असल्याचा इशारा दिला आहे. Yogesh Kadam
राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेतील आमदार अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. वाळू उपसा प्रकरण आणि कांदिवली येथील सावली बारवरून परबांनी मंत्री कदमांना घेरले. सावली बारचे परमिट हे मंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असल्याचा आरोप परबांनी केला.
योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेतून त्यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी परब यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देत म्हटले की, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्धवट ज्ञान आणि अर्धवट वकील परब यांनी माझावर नियम मोडून आरोप केले. परबांनी आपल्या अकलेचे तारे तोडले. त्यांनी वाळू चोरीचा आरोप केला. अनिल परबांविरोधात मी हक्कभंग आणणार आहे, अनिल परबांविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
माझ्या आईचा काहीही संबंध नसताना आरोप करण्यात आले, कोणत्याही प्रकरणाशी माझा संबंध असला तरी मी राजीनामा देईल, चुकीचे आरोप करून आईला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अनिल परबांना माफी मागावी लागेल, असे योगेश कदम यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.
मी वाळू विकली, वाळू विक्रेत्यांना माझा आश्रय आहे, असे आरोप परब यांनी केले आहेत. पण मंडनगडच्या महादेव नाल येथे पाणी साचत असल्याने, गाळ काढला पाहिजे ही मागणी झाली होती. त्यानंतर नियमानुसार त्याला परवानगी होती. तिथे 500 ब्रासची परवानगी होती, ही परवानगी मिळाल्यानंतर न्यायालयाच्या नियमानुसार रॉयल्टी भरली होती. मे महिन्यात गाळाचा उपसा झाला, खेडमध्ये जगबुडी नदीचे पाणी शिरते, तेथील गाळ काढला जावा अशी नागरिकांची मागणी होती, जगबुडी नदीत गाळ आहे. वाळू नाही. घरकुलाचा आणि जगबुडी नदीच्या वाळूचा काहीही संबध नाही. गाळ काढून नेण्याची जबाबदारी 24 शेतकऱ्यांना नियमाने दिली होती, हा गाळ विकला जात नाही कोणी तो घेत नाही, असे स्पष्टीकरण मंत्री योगेश कदम यांनी दिले आहे.
Yogesh Kadam will bring a case against MLA Anil Parab for taking his mother’s name in the House
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला