विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्या लोकांनी माझ्यावर खोटे आरोप करून माझी बदनामी केली आहे, त्या लोकांना मी कोर्टात खेचणार आहे. सोबतच त्या लोकांवर मी अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे, असा इशारा देत दोषी ठरलो तरच राजीनामा देईल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनाचे सभागृह सुरू असताना रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. यानंतर विरोधक आक्रमक झाले असून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
कोकाटे यांच्या इशाऱ्यावर रोहित पवार म्हणाले, विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडीओ शेअर करणं मी टाळत होतो, पण कृषीमंत्र्यांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता? खोटं बोल पण रेटून बोल. शेतकऱ्यांवर अन्याय नको.
माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावाच लागेल, असे सांगून रोहित पवार यांनी म्हटले की, सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे कृषिमंत्र्यांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा. तसेच मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात स्कीप करण्यासाठी 42 सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटेंचं झालंय. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं, पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी भूमिका घेत त्यांनी कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. कृषीमंत्री स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत, त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती.
Rohit Pawar aggressive on Manikrao Kokate’s threat to drag him to court
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये आल्याने चर्चांना उधाण
- ते राजकारणाच्या कचराकुंडीत, सोबत जाईल तोही संपेल, मनोज तिवारी यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
- Vijay Wadettiwar : शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा
- Nitesh Rane : खरा शकुनी मामा मातोश्रीवर, राज ठाकरे यांच्या सभेवरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा