विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सरकारच भिकारी आहे हे सांगून असंवेदनशीलतेचा कळस केला आहे. अशा मंत्र्याला एक मिनिटही पदावर ठेवण्याची गरज नाही. कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिम्मत नाही का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी विचारला आहे.
सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले की, कोकाटे हे विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हिडिओ प्रसार माध्यमासह समाज माध्यमांवरही सर्वांनी पाहिले आहेत. शेतकरी अडचणीत आहे, अवकाळी पावसाने झालेली नुकसान भरपाई दिलेली नाही. शेतमालाला भाव नाही, कर्जमाफीचे आश्वासन देऊनही त्याचा निर्णय होत नाही, राज्याच्या काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा अनेक संकटाचा सामना शेतकरी करत असताना त्याकडे कोकाटे गांभिर्याने पहात नाहीत असेच त्यांच्या कामावरून व बेताल वक्तव्यावरून दिसत आहे. शेतकऱ्याला भिकारी म्हणालो नाही तर ‘सरकारच भिकारी आहे’, राजीनामा दयायला मी काय विनयभंग केला आहे का? अशी मुक्ताफळे उधळून हे महाशय आपण काहीच चुकलो नाही असे बिनधास्त सांगत आहेत. हा प्रकार निर्लज्जपणाचा कळस असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ते जुमानत नाहीत असे त्यांच्या विधानांवरून दिसत आहे. अशा मुजोर मंत्र्याला तात्काळ घरचा रस्ता दाखवला पाहिजे. पण तसे होत नाही हे पाहता फडणवीस यांची काही तरी मजबुरी असेल म्हणून ते कारवाई करण्याची हिम्मत दाखवत नाहीत. कारण काहीही असो अशा व्यक्तीमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा जातो त्याची तरी काळजी करा.
सातत्याने वादग्रस्त विधाने करून माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाची प्रतिमा मलीन केली आहे. अशा व्यक्ती मंत्रिपदावर राहणे राज्याच्या व शेतकऱ्याच्या हिताचे नाही. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण हे चिंताजनक असून महाराष्ट्राला ते भूषणावह नाही, त्यामुळे कोकाटेंचा तातडीने बंदोबस्त करा व नारळ देऊन घरी पाठवा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
If ministers are saying that the government is a beggar, it is the height of insensitivity, says Harshwardhan Sapkal
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये आल्याने चर्चांना उधाण
- ते राजकारणाच्या कचराकुंडीत, सोबत जाईल तोही संपेल, मनोज तिवारी यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
- Vijay Wadettiwar : शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा
- Nitesh Rane : खरा शकुनी मामा मातोश्रीवर, राज ठाकरे यांच्या सभेवरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा