विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sushma Andhare आता या पुढचे वेगवेगळ्या कृती करतानाचे आपले व्हिडिओ आमच्याकडे आहेत. ते काढायला आम्हाला भाग पाडू नका. सन्मानाने एक्झिट घ्या. हे तुमच्यासाठी बरे राहील, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहेSushma Andhare
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळ कामकाज सुरू असताना रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला असून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले की मला रमी खेळता येत नाही. तसेच राजीनामा देण्यासारखे काय केले? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. इतकेच नव्हे तर माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असल्याचा देखील त्यांनी इशारा दिला. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत थेट इशारा दिला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, तुमचे म्हणणे असेल की मी तुम्हाला कोर्टात खेचणार तर आम्हाला कोर्टात नंतर खेचा. तुमची आसन व्यवस्था ज्या ठिकाणी केलेली आहे, ती सर्व सत्ताधाऱ्यांची आसन व्यवस्था आहे. त्यामुळे तुमचा व्हिडिओ हा कोणत्या सत्ताधारी आमदाराने रेकॉर्ड केला? याचा पहिल्यांदा शोध घ्या. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की, तुमची माती तुमचीच माणसे करायला बसलेले आहेत. पहिले बारा सेकंदाचा, त्यानंतर आजचा 24 सेकंदाचा, आता या पुढचे वेगवेगळ्या कृती करतानाचे आपले व्हिडिओ आमच्याकडे आहेत. ते काढायला आम्हाला भाग पाडू नका. सन्मानाने एक्झिट घ्या. हे तुमच्यासाठी बरे राहील, असा इशारा अंधारे यांनी दिला आहे.
माणिकराव कोकाटे यांची उद्धट आणि उर्मटपणाची भाषाच गंभीर आहे. त्यांना विषयाचं गांभीर्य अजूनही कळत नाही. देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात जे मंत्री आहेत त्यांना आपल्या मंत्रीपदाचा औरा कॅरी करता येत नाही. नितेश राणे मंत्री असूनही बालिश आणि समाजात दुही पसरवणारी भाषा करतात. शिरसाट यांच्यासारखा अत्यंत उद्धट माणूस मंत्रीपदावर आहे आणि माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे. यावर आता यांची भाषा आहे की, आम्ही काही विनयभंग केला का? बलात्कार केला का?
सुषमा अंधारे यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, माणिकराव मला आपल्याला इतिहास सांगावे लागेल. मुंबई बॉम्बस्फोटानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्यासोबत राम गोपाल वर्मा यांना फक्त घेऊन गेल्यामुळे आत्ता सत्तेत असलेले आणि तेव्हा विरोधात असलेले भाजपने गदारोळ केला होता. त्याचा परिणाम म्हणून विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
राजकीय व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधीचे वर्तन, व्यवहार कुठे आणि कसे असतात हे फार महत्त्वाचे आहे. ऑनलाइन गेमिंगमुळे इथल्या पिढ्या बरबाद होत आहेत. तुम्ही चक्क सभागृहात रमी खेळतात. ज्या सभागृहातल्या कामकाजासाठी प्रत्येक सेकंदाला चार हजार सातशे रुपये खर्च होतात. हे पैसे माणिकराव तुमच्या खिशातून जात नाहीत, ते जनतेच्या टॅक्स मधून येतात. या पैशातून लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होण्यासाठी अधिवेशन आहे की तुमच्यासारख्या लोकांना रमी खेळण्यासाठी आहे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
Exit with dignity, don’t force me to make more videos, Sushma Andhare warns Manikrao Kokate
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला