विशेष प्रतिनिधी
पाटणा : Tejashwi Yadav बिहारमध्ये मतदार यादी फेरपडताळणीवरून मोठे वादंग निर्माण झाले असतानाच आमच्याकडे आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे संकेत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी दिले आहेत. बिहारमध्ये मतदार यादी फेरपडताळणीच्या नावे गैरप्रकार केला जात आहे. तो एखाद्या फसवणुकीपेक्षा कमी नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.Tejashwi Yadav
पत्रकारांशी बोलताना यादव म्हणाले की, बिहारची राजधानी पाटणा आम्ही विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. योग्य वेळी आम्ही इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत. मतदार यादी फेरपडताळणी ही एक प्रकारची फसवणूक आहे. यात बुथस्तरीय अधिकारी मतदारांच्या स्वाक्षऱ्या व अंगठ्यांचे ठसे घेत आहेत. कोऱ्या प्रमाणपत्रांचा वापर हा रद्दीच्या कागदासारखा केला जात आहे.
मुक्त पत्रकारांवर गुन्हा दाखल केला जात आहे. सरकारला हे सगळे योग्य वाटत आहे. कारण की, निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचा विचार व शस्त्र
म्हणून काम करीत आहे, असा जोरदार हल्ला तेजस्वी यादव यांनी चढविला. बिहारमधील मतदार यादी फेरपडताळणीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मौन बाळगले आहे; पण संसदीय कामकाजमंत्री विजयकुमार चौधरी यांनी या फेरपडताळणीला नियमित प्रक्रिया संबोधले आहे; पण रोजगारासाठी बिहार सोडणाऱ्यांची संख्या ३ कोटी झाली आहे. तरीही सरकार उलट दावे करीत आहे,
असा आरोप तेजस्वी यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
आधार कार्ड व राशन कार्ड या दस्तावेजांना स्वीकार्य दस्तावेजात सामील करण्यावर विचार केला जात नाहीय. राज्यात खरा खेळ हा १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ज्यात मतदारांना आक्षेप नोंदविण्याची मुभा मिळेल, असेही ते म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भाषा करणाऱ्या राजद व इतर विरोधी पक्षांनी आताच पराभव मान्य केला आहे, असा पलटवार जदयुचे नेते तथा केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी केला. राजदचा बनावटपणा उजागर झाला आहे. त्यामुळेच ते निवडणुकीपासून पळ काढण्याची भाषा करीत असल्याचा टोला सिंह यांनी लगावला.