Rahul Gandhi जातनिहाय जनगणना न करू शकणे ही माझी चूक, राहुल गांधी यांची कबुली

Rahul Gandhi जातनिहाय जनगणना न करू शकणे ही माझी चूक, राहुल गांधी यांची कबुली

Rahul Gandhi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जातनिहाय जनगणना न करू शकणे ही माझी चूक आहे. आता ही चूक दुरुस्त करण्याची आपली इच्छा आहे. काँग्रेस शासित सर्व राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना केली जाईल, असे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिले आहे. Rahul Gandhi

राजधानी दिल्लीत आयोजित ‘भागीदारी न्याय महासम्मेलनात’ बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, माझा उद्देश देशातील उत्पादक शक्तीला सन्मान मिळवून देणे आहे. ओबीसी, दलित, आदिवासी हे देशाची उत्पादक शक्ती आहे. मात्र, त्यांना आपल्या श्रमाचे फळ मिळत नाहीये. एवढेच नाही तर, आरएसएस आणि भाजपने जाणून बुजून ओबीसींचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न केला.ओबीसींच्या समस्या लपलेल्या असतात.



जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला एका गोष्टीची कमतरता जाणवते. ती चूक म्हणजे मी ओबीसी वर्गाचे संरक्षण जसे करायला हवे होते, तसे करू शकलो नाही अशी कबुली देऊन राहुल गांधी म्हणाले, जेव्हा आपण आदिवासी भागांत जाता, तेव्हा आपल्याला जंगल, पाणी, जमीन, सर्वकाही दिसते. मात्र ओबीसींच्या समस्या लपलेल्या असतात. जर मी तेव्हा जातीय जनगणना केली असती, तर.

मला वाईट वाटते की, जर मला आपल्या इतिहासाबद्दल थोडी अधिक माहिती असती, तर मी तेव्हाच त्याचे समाधान केले असते. मी व्यासपीठावरून हे सांगत आहे की, ही माझी चूक आहे. ही काँग्रेस पक्षाची नाही तर माझी चूक आहे. मी ती दुरुस्त करणार आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे की, जर मी तेव्हा जातीय जनगणना केली असती, तर आता ती ज्या पद्धतीने करायची आहे, तशी झाली नसती, असेही राहुल गांधी म्हणाले.

Not being able to conduct caste-wise census is my mistake, admits Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023