Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा दिला नाही तर राज्यभर आंदोलन, छावा संघटनेचा इशारा

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा दिला नाही तर राज्यभर आंदोलन, छावा संघटनेचा इशारा

Manikrao Kokate

विशेष प्रतिनिधी

पुणे : Manikrao Kokate माणिकराव कोकाटे हा असंवेदनशील कृषिमंत्री आहे. कोकाटेंचा राजीनामा व्हावा यासाठी मंगळवार पर्यंत आम्ही वाट बघणार आहोत, राजीनामा दिला नाही तर मी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी दिला आहे.Manikrao Kokate

विजयकुमार घाडगे लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी पत्ते उधळत कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण आणि इतर कार्यकर्त्यांनी विजय घाडगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या २-३ कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. मारहाण झालेले विजय घाडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी घाटगे यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली

घाडगे यांनी बैठकीत अजित पवार यांना आम्हाला का मारलं? आमचं काय चुकलं? असा प्रश्नही विचारला यावर अजित पवारांनी मारहाणीच्या घटनेबाबत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, जी घटना घडली ती चुकीचीच आहे, महाराष्ट्रातील राजकारणात असे व्हायला नाही पाहिजे. या बैठकीत घाडगे यांनी आरोपीवर किरकोळ गुन्हे दाखल केले, सोडून दिले. अशी तक्रार केली असता अजित पवार लातूर पोलिसांशी बोलले, हे खपवून घेतलं जाणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. अजित पवारांना आम्ही भेटायला गेलो असताना आमचे मोबाईल बाहेर काढून घेतले होते, असेही घाडगे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

घाडगे यांनी मी मीडियाला घेतलयाशिवाय दादांना भेटणार नाही. मी लातूरला चाललो आहे. मी एकटा भेटायला येतो असे सांगितले होते. पण त्यांनी ऐकले नाही. आता मी सरळ थेट लातूरला जात आहे. पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते.

Chhawa organization warns of state-wide agitation if Manikrao Kokate does not resign

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023