विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav and Raj Thackeray शिवसेनेत बंद करून एकनाथ शिंदे आणि टोळ्यांच्या सहकाऱ्यांनी सरकार स्थापन केले. त्यानंतर निवडणूक आयोगाने खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल दिला. तेव्हापासून अधिकृत शिवसेना कोणाची असा वास आहे. उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख म्हटल्याने पुन्हा ही चर्चा सुरु झाली आहे.Uddhav and Raj Thackeray
उद्धव आणि राज या ठाकरे बंधुंनी एकत्र यावे ही शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधुंच्या युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यासोबत त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुनही मोठ्या भावाला शुभेच्छा दिल्या. एक्सवर शुभेच्छा देताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे’ असा केला. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच अधिकृत शिवसेना असल्याचेच राज ठाकरे यांनी या शुभेच्छा संदेशातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेनेत २०२२ मध्ये झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा ओरिजिनल शिवसेना असल्याचा निकाल दिला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील विधानसभेतील आकडेवारीवरुन शिंदेच्या शिवसेनेला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आले. यामुळे उद्धव ठाकरेंच्या नावासह असलेल्या शिवसेनेचे नाव शिवसेना उबाठा असे घेतले जाऊ लागले. उबाठा गट असेही त्यांच्या पक्षाला विरोधकांकडून संबोधण्यात येऊ लागले. आज बंधू राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर सोशल मीडियावर भेटीचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हटले की, “माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या..”
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या पक्षनावाचा उल्लेख न करता थेट शिवसेना असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना पक्षप्रमुख’ म्हटले आहे. यामुळे खरी शिवसेना कोणाची याची अधिकृत घोषणाच राज यांनी उद्धव ठाकरे यांच्या 65व्या वाढदिवशी करुन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाचे सर्वात मोठे गिफ्ट दिल्याचे मानले जात आहे.