विशेष प्रतिनिधी
मुंबई : Pratap Sarnaik मराठी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने अॅप आधारित प्रवासी वाहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन विभागाच्या पुढाकाराने ही सेवा सुरू करण्यात येणार असून, तिच्यासाठी ‘जय महाराष्ट्र’, ‘महा-राईड’, ‘महा-यात्री’, ‘महा-गो’ अशा पर्यायी नावांचा विचार सुरू आहे, अशी माहिती माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.Pratap Sarnaik
सरनाईक म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अंतिम संमतीनंतर हे शासकीय ॲप लवकरच सुरु करण्यात येईल,. या उपक्रमासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी’ आणि ‘मित्र’ या संस्थांबरोबरच काही खासगी कंपन्यांशी संवाद सुरू आहे. ॲपमध्ये पारदर्शक व्यवस्था राहावी यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात येणार असून, लवकरच हे ॲप तयार होईल
या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी युवक-युवतींना आर्थिकदृष्ट्या विशेष मदत दिली जाणार आहे. बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, मुंबई बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी 10 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे, अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई बँकेच्या सहाय्याने बेरोजगार तरुणांना आर्थिक मदतीचा लाभ मिळेल. यासोबतच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त जाती महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी या संस्था 11 टक्के व्याजाचे अनुदान परतावा स्वरूपात देतील. त्यामुळे हे कर्ज जवळपास बिनव्याज असल्यासारखे ठरेल, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.