विशेष प्रतिनिधी
लडाख : लडाखच्या गलवान मधील चारबाग भागात बुधवारी सकाळी सुमारे 11.30 वाजता एक भीषण दुर्घटना घडली. दुरबुकहून चोंगताशच्या दिशेने जात असलेल्या सैन्य ताफ्यावर भूस्खलनामुळे अचानक एक मोठा दगड कोसळला. या घटनेत सैन्याचं वाहन पूर्णतः नुकसान झालं असून दोन अधिकारी शहीद झाले आहेत.
शहीद झालेल्यांमध्ये 14 सिंध हॉर्स रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल मनकोटिया आणि दलजीत सिंह यांचा समावेश आहे. अपघातात मेजर मयंक शुभम (14 सिंध हॉर्स), मेजर अमित दीक्षित आणि कॅप्टन गौरव (60 आर्म्ड) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ एअरलिफ्ट करून उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
आतंकवाद भगवा न कभी था, ना है और ना…मालेगाव बाँबस्फोट निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
सैन्य दलाचा ताफा ट्रेनिंगसाठी चोंगताशला निघाला होता, त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सध्या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे.
Two officers martyred, three seriously injured in Galwan after stone falls on military vehicle
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान