विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला अनेक धक्के दिले आहेत. आता तर काँग्रेसनेच शरद पवार यांचा मराठवाड्यातील नेता पळवला आहे.Sharad Pawar
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यातील मोठे नेते आणि परभणीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी पक्ष सोडण्याचे निश्चित केले असल्याचे मानले जात आहे. बाबाजानी दुर्राणी हे सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार नसून काँग्रेसमध्ये प्रवास करणार असल्याची चर्चा आहे. येत्या 7 ऑगस्टला त्यांचा मुंबईत काँग्रेस मुख्यालयात पक्ष प्रवेश होणार आहे. बाबाजानी दुर्राणी यांच्या समर्थकांकडून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाचे बॅनर सोशल मीडियावर झळकत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बाबाजानी दुर्राणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. ते अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र काही दिवसांपासून त्यांच्या काँग्रेस नेत्यांसोबतच्या भेटीगाठी वाढल्या. आता ते येत्या 7 तारखेला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे पोस्टर्स सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहेत. त्यामुळे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर आता भारतीय जनता पक्षात आहेत. ते भाजपवासी झाल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसकडे कोणताही मोठा नेता नाही. दुर्राणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची चर्चा आहे.
बाबाजानी दुर्राणी हे परभणीतील मोठे नेते आहेत. 2004 मध्ये ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. 2012 आणि 2018 असे सलग दोनदा शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर पाठवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दुर्रानी अजित पवारांसोबत गेले होते. मात्र तिथे त्यांच्या हाती काही लागले नाही आणि ते पुन्हा शरद पवारांसोबत गेले. आता शरद पवारांची साथ सोडून ते काँग्रेसच्या वाटेवर आहे. परभणी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी त्यांच्यामुळे भरून निघण्याची शक्यता आहे.
Sharad Pawar’s NCP also got a blow from Congress, a big leader from Marathwada was kidnapped
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shi