विशेष प्रतिनिधी
पुणे ; Kirit Somayya प्रार्थस्थळावरील भाेंगे हटविण्याबाबत जसे काम मुंबई आणि ठाण्यात झाले आहे तसे काम पुण्यातही व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मशीदींवरील भाेंगे हटविण्याची मागणी केली.Kirit Somayya
मुंबई उच्च न्यायालय आणि मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार भोंगेमुक्त मोहिमेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभर करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील यंत्रणेला सक्रिय करण्यासाठी सोमय्या पुण्यात आले हाेते. ते म्हणाले, मुंबई आणि ठाण्यात जशी अंमलबजावणी झाली, तशीच पुण्यातही व्हावी यासाठी मी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आणि सर्व पोलीस ठाण्यांना पत्र पाठवले आहे.Kirit Somayya
पुण्यातील एका भागात १४ मशिदी असून तिथे मोठ्या प्रमाणावर भोंगे लावण्यात आले आहेत. दिवसातून पाच वेळा नमाज पठणासाठी मोठ्या आवाजात भोंगे वाजवले जातात. यामुळे ध्वनी प्रदूषण होते आणि कायद्याचा भंग होतो. ध्वनी प्रदूषण कायदा सर्वांसाठी समान आहे. काही राजकीय नेते केवळ मशिदींवर भोंगे लावून दादागिरी करत आहेत. गेली २४ वर्ष ही दादागिरी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी कारवाई सुरू आहे पण अजूनही काही ठिकाणी अंमलबजावणीत अडथळे आहेत.
संभाजीनगरात सध्या ७० टक्के भोंगे उतरवण्यात आल्याचे सांगून साेमय्या म्हणाले, अनेक मंदिरांमधूनही भोंगे खाली घेतले गेले आहेत आणि डीजे वाजवण्यावरही हळूहळू कायद्याप्रमाणे निर्बंध आणले जात आहेत. हा विषय राजकीय नाही, तर कायद्याच्या अंमलबजावणीचा आहे. मी स्वतः ही जबाबदारी घेतली असून संपूर्ण राज्यभर फिरत आहे. विधानसभेतही अनेक आमदारांनी या विषयावर आवाज उठवला आहे. पुणे पोलिसांनी मुंबईसारखा आदर्श ठेवावा अशी अपेक्षा सोमय्यांनी व्यक्त केली.
Kirit Somayya hopes to do the same in Pune as has been done in Mumbai regarding the removal of Loudspeakers
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान