विशेष प्रतिनिधी
नागपूर : Nitin Gadkari गांधी व नेहरूंच्या दोन गोष्टी अतिशय प्रसिद्ध आहेत. आपल्याला जास्तीत जास्त उत्पादनाची आवश्यकता आहे, असे नेहरू म्हणायचे. तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवून उत्पादन वाढविले पाहिजे, असे गांधीजींचे विचार होते. आमचेदेखील सर्वात जास्त प्राधान्य रोजगार निर्मितीवरच आहे, असे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गांधी- नेहरूंचा सिध्दांत मांडला.Nitin Gadkari
नागपुरात भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) नवीन विदर्भ विभागीय कार्यालयाचे गडकरींच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. यावेळी बाेलताना गडकरी म्हणाले, विदर्भात रोजगार निर्मिती करूनच येथील गरीबी दूर होऊ शकेल. सुखी-समृद्धी विदर्भ हा कृषी व उद्योग क्षेत्राच्या विकासातूनच साकारू शकतो. विदर्भातील लोकांच्या आशा आकांक्षा विकासाशी जुळल्या आहेत. विदर्भ समृद्ध झाला तर महाराष्ट्र व पर्यायाने देश समृद्ध होईल. सीआयआयसारख्या उद्योजकांच्या संस्थांनी या दिशेने काम केले पाहिजे.Nitin Gadkari
कुठल्याही उद्योगाच्या विकासासाठी पाणी ,ऊर्जा ,वाहतूक आणि संचार या गोष्टी महत्त्वाच्या असून विदर्भातील खनिज, कोळसा, वनउत्पादन पर्यटन कापूस उद्योग या सर्व उद्योगवाढीच्या संभावनांचा कॉन्फिडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीच्या विदर्भात होत असलेल्या विभागीय कार्यालयाने अभ्यास करून या क्षेत्रातील कमकुवत दुवे ओळखावे आणि त्यांना बलस्थानामध्ये रूपांतरित करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.
Need to combine production growth and employment creation, Nitin Gadkari proposed Gandhi-Nehru theory
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान