विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये तीन मागासवर्गीय तरुणींचा पोलिसांकडून आणि इतरांकडून छळ, विनयभंग करण्यात आला. त्यांना जातिवाचक शिवगाळ करण्यात आली असा आरोप करत पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर रात्रभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. Kothrud Harassment and molestation
छत्रपती संभाजीनगर येथील एका महिलेच्या तपासासाठी तीन तरुणींना कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते. पोलीस ठाण्यातील रिमांड रुमध्ये त्यांची पाच तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्या जात, धर्मावरुन त्यांच्यावर टिप्पणी केली गेल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. Kothrud Harassment and molestation
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रॉसिटी) कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची विनंती पीडित तरुणींनी केली. मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने रात्री तीनपर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या दिला होता.
तरुण मुलींच्या घरात घुसून त्यांना जातिवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप कोथरुड पोलिसांवर होत आहे. मुलींना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आणि रात्री तीन, साडेतीन वाजता त्यांना सोडून देण्यात आले. याप्रकरणी दोषी पोलीस अधिकारी आणि कार्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. मुली ज्या घरात राहातात त्या घरमालकालाही धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. रविवारी रात्री जवळपास तीन वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रशांत जगताप यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीडित तरुणी आणि कार्यकर्त्यांशी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी चर्चा केली, मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही..
Kothrud Harassment and molestation of backward class girls by police, protest all night in front of Pune Police Commissioner’s office
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान