विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून अपमान झाल्याचा आरोप करत राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. Anna Bansode
अण्णा बनसोडे आणि त्यांच्या पक्षाचे सर्व वरिष्ठ सहकारी आंदोलन करून निवेदन देण्यासाठी महापालिकेत आले होते. निवेदन घेण्यासाठी महापालिकेचं कोणतंही राजपात्रित अधिकारी हजर नसल्याने संतापलेल्या अण्णा बनसोडे यांनी अक्षरशः आपल्या सहकाऱ्यांसह पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दारावर बसून ठिय्या आंदोलन केले आहे. Anna Bansode
पिंपरी चिंचवड शहरात विकास आराखड्याच्या नावावर टाकण्यात आलेल्या चुकीच्या आरक्षणाविरोधात आम्ही मोर्चा काढून निवेदन देणार होतो. याची पूर्व कल्पना आयुक्तांना असताना देखील आयुक्त शेखर सिंह हे स्वतःही हजर राहिल नाही.. तसेच त्यांच्या अख्यारीत असलेले इतर कनिष्ठ राजपात्रित अधिकारी देखील उपस्थित नसल्याने अण्णाभाऊ बनसोडे यांना महापालिकेच्या दारावरच जवळपास तीस मिनिटं टाकलात उभे रहावे लागले असा आरोप बनसोडे यांनी केला आहे.
महापालिकेच्या चुकीच्या विकास आराखडा विरोधात आम्ही आधी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देऊन आमचं म्हणणं मांडणार होतो. मात्र शेखर सिंह यांना संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला देखील कशी वागणूक द्यावी याची जाणीव नसल्याने त्यांची तक्रार आता आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे करणार असे अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
Anna Bansode stages sit-in protest at the door of the Municipal Corporation
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!