विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर (ECI) जोरदार आरोप केले. मात्र, या सर्व आरोपांची तपासणीपूर्वक पडताळणी केली असता, हे आरोप अनाधार, तर्कहीन आणि फोल असल्याचे स्पष्ट होते. Rahul Gandhi
राहुल गांधी यांनी भाजपसह आयोगावर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतांची चोरी केल्याचा आरोप करत, ही घटना भारतीय संविधानावरचा गुन्हा असल्याचे म्हटले. त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका “चोरल्या” गेल्या असून, कर्नाटकमधील महादेवपूरा विधानसभा मतदारसंघात तब्बल एक लाख बनावट मतदार नोंदवले गेले, असा खळबळजनक दावा केला. Rahul Gandhi
राहुल गांधींनी काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणात कर्नाटकमधील १६ जागा जिंकण्याचा अंदाज असल्याचा दावा केला. प्रत्यक्षात पक्षाला ९ जागाच मिळाल्या. हेच त्यांनी मतचोरीचे ‘पुरावे’ म्हणून मांडले. मात्र अंतर्गत सर्वेक्षणे ही विश्वसनीय किंवा स्वतंत्र स्रोतांवर आधारित नसतात. ती फक्त प्रचार मोहिमेतील आशावाद दर्शवतात. जर सर्वेक्षणाचे निकाल हवे तसे न आल्याने निवडणूक फसवणूक ठरवायची असेल, तर कोणतीही हार ‘षडयंत्र’ ठरू शकते. भाजपनेही ४०० पारचा दावा केला होता, पण त्यांनी हरवलेल्या जागांवर शंका घेतली नाही.
गांधी यांनी दावा केला की, दोन टर्मनंतर भाजपला तिसऱ्यांदा सत्तेवर येणे ही संशयास्पद गोष्ट आहे. मात्र स्वतःच्या आजीच्या म्हणजे इंदिरा गांधी यांच्या उदाहरणावरून राहुल गांधी यांनी लक्षात घ्यायला हवे की प्रत्येक वेळेस सरकारविरोधी लाट असेलच, हा गृहितक चुकीचा आहे. नेहरू, इंदिरा गांधी, अँजेला मर्केल यांच्यासारख्या नेत्यांनीही सलग कार्यकाळ मिळवले आहेत. जर मतदारांना स्थैर्य आणि विकास दिसतो, तर ते पुन्हा निवडतात.
गांधींनी गुरकीरत सिंग डांग यांचे नाव चार ठिकाणी असल्याचे दाखवत, हजारो बनावट मतदार असल्याचा दावा केला.शहरी भागात स्थलांतर सामान्य आहे. नवीन पत्त्यावर नाव नोंदवल्यानंतर जुने नाव हटवले गेले नसेल, तरी एकाच व्यक्तीने अनेक ठिकाणी मतदान केले असे समजता येत नाही.याशिवाय, सर्व पक्षांना मतदार यादी वेळेआधी दिली जाते. त्यावर आक्षेप घेण्याची संधी राहुल गांधींनी का वापरली नाही?
जर एक व्यक्ती दोनदा मत देते, तर ते भाजपलाच का दिले असेल, याचा काही पुरावा नाही. गुप्त मतदानाच्या तत्त्वामुळे कोणत्या मतदाराने कोणाला मतदान केले, हे समजणे शक्यच नाही. हे आरोप केवळ राजकीय हेतूंनी प्रेरित आहेत. जर काही चुकाही झाली असेल, तर ती प्रणालीगत त्रुटी आहे, पक्षीय कटकारस्थाने नव्हे.
महादेवपूरा मतदारसंघात काही मतदारांचे पत्ते अपूर्ण आहेत, हे गांधींनी दाखवले. माहिती तंत्रज्ञानातील त्रुटी, स्थलांतर, जुने रेकॉर्ड यामुळे अशी अपूर्ण माहिती असते. यातून बनावट मतदार असणे सिद्ध होत नाही. प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र पडताळणी केल्याशिवाय हे म्हणणे भ्रामक आहे.
गांधींनी दावा केला की ४,००० मतदारांची यादीत फोटो नव्हते, म्हणून ते बनावट असतील.फोटो नसणे हे अनेकदा डेटा सिंक्रोनायझेशनमधील चूक, अपलोडिंग त्रुटी किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे घडते.फोटो नसणे म्हणजे त्या व्यक्तीने मतदान केल्याचे निदर्शक नसते.
गांधी म्हणाले की, वयस्कर व्यक्तींनी फॉर्म ६ भरल्याने हे बनावट वाटते.फॉर्म ६ कोणत्याही वयात प्रथमच नोंदणीसाठी वापरता येतो. त्यासाठी वयाची अट नाही. अनेक वयस्कर व्यक्तींनी २०२४ मध्ये पहिल्यांदाच मतदान केले, ज्याचे स्वागतच व्हायला हवे.
पत्रकारांनी विचारल्यावर, गांधींनी ‘मी राजकारणी आहे, माझे प्रत्येक विधान शपथेखालीच असते’ असे म्हटले. मात्र, कोणतीही विधीपूर्वक शपथ घेतली नाही.जर त्यांचा दावा एवढा ठाम होता, तर त्यांनी निवडणूक आयोगाला अधिकृत यादी दिली असती.सुप्रीम कोर्टानेही राफेल प्रकरणात राहुल गांधींच्या खोटेपणाची दखल घेतली होती.
कर्नाटकात मतदारांची डुप्लिकेशन दाखवताना, बिहारमध्ये मतदार यादी तपासणीसाठी सुरू झालेल्या SIR (Systematic Investigation of Electoral Rolls) मोहिमेला काँग्रेसनेच विरोध केला. तुम्ही एकीकडे निवडणूक यादीतील चुका दाखवता आणि दुसरीकडे त्या सुधारण्याच्या प्रयत्नांना विरोध करता, तर तुमच्या हेतूवरच शंका येते.
गांधींचा हा पहिला आरोप नाही. २०१९ मध्ये काँग्रेसने लंडनमध्ये ईव्हीएम हॅकिंग शो आयोजित केला होता, ज्यात कोणताही पुरावा नव्हता.निवडणूक आयोगाने राहुल गांधींना आता पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नियम 20(3)(b) अंतर्गत घोषणापत्र न दिल्यास, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
राहुल गांधींच्या आरोपांमध्ये पुराव्याचा अभाव, अतिरंजित विधाने, आणि दुटप्पीपणा स्पष्टपणे दिसतो. मतदारांनी जे मत दिले आहे, त्याचा आदर करणे ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. कोणत्याही पराभवावर ‘मतचोरी’चा ठपका ठेवणे म्हणजे जनतेच्या निर्णयाचा अपमान आहे.
Rahul Gandhi’s allegations of ‘vote rigging’ are false, baseless allegations
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!