विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar कोणी चुकत असेल, तर त्याला सांगायला हवं , मुलगा असो किंवा मुलगी, दोनवर थांबायला शिका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.Ajit Pawar
पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्यात बोलताना अजित पवार म्हणाले, मी एका भगिनीला विचारलं, एक मुलगी इथे आहे, दुसरी कुठे आहे? ती म्हणाली, घरी आईकडे ठेवली आहे. दोन मुली असताना ती पुन्हा गरोदर दिसली. याबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, ‘आहे पोटात.’ मी म्हणालो, आता बास करा. आता तुम्हीच सांगा, वरून ब्रह्मदेव जरी आला, तरी लोकसंख्या वाढ थांबवणं कठीण आहेAjit Pawar
अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाने आपआपल्ल्या स्तरावर काळजी घेतली पाहिजे. कोणी चुकत असेल, तर त्याला सांगायला हवं , मुलगा असो किंवा मुलगी, दोनवर थांबायला शिका. सरकारने नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यासाठी दोन अपत्यांचा नियम केला आहे. पण लोक आम्हाला विचारतात की, तुम्ही आमच्यासाठी कायदा केला, पण खासदार आणि आमदारांना का नाही? जर ही गोष्ट आमच्या हातात असती, तर दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्या लोकांना निवडणुकीत उभे राहता आले नसते. त्यामुळे पुढे संधी मिळाल्यास त्यावर विचार करू.
पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार होत असल्याने पोलीस दलावर कायदा सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आहे. समाजात वावरताना जनतेला सुरक्षित वाटावे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीस दलाला आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शासनाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राज्यात ५ टक्के अर्थात १ हजार १०० कोटी रुपये पोलीस दलासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागासाठी पोलीस दलाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात ४० कोटींचा निधी देण्यात आला.
Whether it’s a boy or a girl, learn to stop at two, Ajit Pawar’s appeal for population control
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल