विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांना काही लोक निवडणुकीपूर्वी भेटले आणि 160 जागांवर विजय मिळवून देतो विशिष्ट रक्कम द्या अशी मागणी केली. असेच काही लोकं उद्धव ठाकरेंना लोकसभा आणि विधानसभेलाही भेटले होते, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. Sharad Pawar
त्या लोकांचे म्हणणं होते अडचणीतील 65 जागा सांगा त्या आम्ही तुम्हाला ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करून देतो. आम्ही त्या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. त्यांनी स्पष्ट सांगितले की सत्ताधाऱ्यांनी ही योजना तयार केली आहे, तुमचे अपयश मला दिसते आहे, पण आमचा निवडणूक आयोग आणि लोकशाहीवर विश्वास आहे असे आम्ही त्यांना सांगितले. पण आता या गोष्टीमध्ये तथ्य आहे असे दिसून येत आहे.देशातील वातावरण पाहता आम्ही लोकसभा जिंकू असे त्यांना ठाकरेंनी सांगितले आणि आम्ही जिंकलो ही. असे घोटाळे करत निवडणूक जिंकण्याची आम्हाला गरज वाटत नाही, असेही राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे ह्या महायुतीचे अनेक घोटाळे आहेत. या घोटाळे करणाऱ्या सरकारच्या विरोधात अनेकदा आवाज उठवून देखील राज्यपालांपासून मोदी-शहा यांच्यापर्यंत कोणीच काही ऐकायला तयार नाही, असा आरोप करून राऊत म्हणाले, महाराष्ट्र लुटणाऱ्या या दगाबाज सरकारला पाठीशी घालते जात आहे. यामुळे लोकांमध्ये जात जागृती करणे हाच एकमेव पर्याय आमच्याकडे आहे.
संजय राऊत म्हणाले की,राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपचा इतका मोठा घोटाळा बाहेर काढला. तरीसुद्धा निवडणूक आयोग राहुल गांधी यांना शपथपत्र मागत आहे. त्यांनी पुराव्यानिशी हे सगळे सांगितले असताना शपथपत्र मागितले जात आहे. राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते आहेत. ते जबाबदारीने बोलत असून त्यांनी पुराव्यानिशी बोलत आहे. मत चोरीच्या शहानिशा माध्यमांनीही केली तरीही निवडणूक आयोग पुरावे मागत असेल तर त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली असून तोंडात बोळा कोंबलेला आहे हे दिसत आहे. या विरोधात इंडिया आघाडी उद्या आंदोलन करत आहे.
संजय राऊत म्हणाले की, माझे मत कुणाला गेले हे मला समजले पाहिजे तसा मला संविधानाने अधिकार दिला आहे. निवडणूक पद्धतीमध्ये इतके घोटाळे आहेत की मोदी-शहा-फडणवीस यांच्यासारखे लोक संपूर्ण निवडणूक पैशाच्या आणि सत्तेच्या जीवावर चोरतात. त्याच पद्धतीचे एजंट त्यांनी निर्माण केले आहेत. निवडणूक यंत्रणा पारदर्शक नाही हे सर्व घटनेतून दिसून येत आहे. मुंबई मराठी माणसांकडे राहू नये यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर ते ‘गायब’ झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत म्हणाले की, धनखड यांना त्यांच्या राहत्या घरी ‘हाऊस अरेस्ट’ केले असल्याची शक्यता असून, विरोधकांना गायब करण्याची ही चीन आणि रशिया सारखी पद्धत भारतात सुरू झाली असेल, तर राहुल गांधी यांच्यासह सर्वांनीच सावध राहायला हवे. या घटनेमुळे भारताची राजकीय व्यवस्था बिघडली आहे.
Like Sharad Pawar, people also met Uddhav Thackeray for the EVM scam, claims Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!