विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्लाला आपण चोख प्रत्युत्तर दिले. जगाला संदेश दिला की, आम्ही कोणाला छेडत नाही, पण जर कोणी आम्हाला छेडले, तर आम्ही त्याला सोडत नाही. आम्ही धर्म विचारून नाही तर कर्म पाहून मारतो, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला.
मध्य प्रदेशात झालेल्या एका कार्यक्रमात पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना मारले होते, पण भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी पहलगाममध्ये लोकांना त्यांचा धर्म विचारून मारले, पण आम्ही त्यांचा धर्म विचारून नाही, तर कर्म पाहून मारले. 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार स्थापन झाले, तेव्हा पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे आपण संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी झालो.
आज आपण भारतातही अशी शस्त्रे बनवत आहोत, जी आपण इतर देशांकडून खरेदी करायचो. आज भारताची संरक्षण निर्यात दरवर्षी सुमारे 24 हजार कोटींची झाली असून हा एक विक्रम आहे. हे क्षेत्र आता फक्त भारताची सुरक्षा मजबूत करत नाही, तर स्वतःची वाढ करण्याबरोबरच अर्थव्यवस्थेच्या वाढीलाही हातभार लावते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही टीका करताना राजनाथ सिंह म्हणाले, काही लोक आहेत, जे भारताच्या विकासावर खूश नाहीत. त्यांना भारताचा विकास होत आवडत नाही. त्यांना वाटते की, आपण सर्वांचे मालक आहोत. मग भारत इतका वेगाने कसा वाढत आहे? हे लोक भारतात बनवलेल्या वस्तू त्यांच्या देशात बनवलेल्या वस्तूंपेक्षा महाग करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला विश्वास आहे की, या सर्वात भारत इतक्या वेगाने प्रगती करत आहे की, आता जगातील कोणतीही शक्ती भारताला महाशक्ती होण्यापासून रोखू शकत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
We kill people not by asking about religion but by looking at their deeds, warns Defence Minister Rajnath Singh
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला