विशेष प्रतिनिधी
पुणे : Mahavitaran mobile app खरेदी-विक्री, बक्षीस पत्र, मृत्यू, वारसा आदी कारणांमुळे मिळकतीच्या मालकी हक्कात/नावात बदल होत असतो. तसाच बदल वीजग्राहकाला त्याच्या वीजबिलावरील नावातही करावा लागतो. ‘नावात बदल’ करण्यासाठी वीजग्राहकांना आता घरबसल्या व ऑनलाईन अर्ज करता येतो. त्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. महावितरणच्या मोबाईल ॲपवर व wss पोर्टलवर ही सुविधा २४ तास उपलब्ध आहे.Mahavitaran mobile app
महावितरणच्या बहुतांश ग्राहक सेवा मोबाईल ॲप व संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ग्राहकाला स्वत:चा ‘युजर नेम’ आयडी तयार करुन घरबसल्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेता येतो. नवीन कनेक्शनसाठी अर्ज करणे, वीजबिल पाहणे, भरणे, तक्रारी नोंदवणे, त्याचा पाठपुरावा करणे, रिडींग नोंदवणे, वीजबिल भार कमी/जास्त करणे, जुन्या बिलांचा इतिहास, बिल कॅलक्युलेटर यांसह नावात बदल करणे ही प्रमुख सुविधा देखील मोबाईल ॲप तसेच https://wss.mahadiscom.in/wss/wss या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत.
महावितरणचे राज्यभरात सुमारे तीन कोटींहून अधिक ग्राहक आहेत. तसेच दरवर्षी काही लाख ग्राहकांची भर त्यात पडते. खरेदी-विक्री, बक्षीस पत्र, मृत्यू, वारसा, विभक्त कुटुंब पध्दती आदींमुळे मिळकतीचे नावे बदल असतात. मालकी हक्कात नाव बदलल्यास इतर विभागाप्रमाणे वीजबिलाच्या नावात बदल करणेही गरजेचे असते. त्यासाठी पूर्वी कार्यालयात जाणे अपरिहार्य होते. विविध अर्जासोबत ‘प्रपत्र उ’ भरावे लागे. तर पुराव्यासाठी बरीच कागदपत्रे जोडावी लागायची. ‘प्रपत्र उ’ मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. मिळकतीचे नाव बदलल्याचा पुरावा व सुरक्षा ठेव नवीन ग्राहकांच्या नावे करण्यासाठी ‘Form X’ याचा फोटो काढून अपलोड केला की नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होते. येणाऱ्या बिलामध्ये नाव बदलून येते.
ॲप नोंदणी कशी कराल…
महावितरण ॲप इन्स्टॉल केल्यास सर्वप्रथम भाषा निवडावी नोंदणी करण्यासाठी सदस्य बना/ Don’t have account sign up वर क्लिक करावे. त्यानंतर 12 अंकी वीजग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल, प्रवेशाचे नाव (Login ID) व पासवर्ड टाकून नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर login केल्यास सर्व परवानग्या (permissions) स्विकाराव्यात म्हणजे आपले ॲप विनासायस काम करु शकेल.
नावात बदल करण्यासाठी…
ॲपच्या डाव्या कोपऱ्यात सेवांची लिंक दिली आहे. त्यात बरेच पर्याय आहेत. पैकी ‘नाव बदलाची मागणी’ पर्याय निवडावा. ग्राहक क्रमांक निवडल्यास ‘प्रपत्र उ’ येते. बदल करावयाची किंवा नविन मालकाची माहिती भरावी. बदलाचे कारण निवडून अटी मान्य कराव्यात व पुढे जाऊन मिळकतीचा पुरावा व Form x चा फोटो काढून अपलोड करावा. माहिती अपलोड होताच नोंदणी क्रमांक मिळतो.
‘Change in name’ of electricity bill now available online from home, on Mahavitaran mobile app and website
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला