आदिती तटकरे रायगडला तर गिरीश महाजन नाशिकमध्ये करणार झेंडावंदन

आदिती तटकरे रायगडला तर गिरीश महाजन नाशिकमध्ये करणार झेंडावंदन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महायुतीचे सरकार येऊन आठ महिने झाल्यानंतरही अजूनही रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटलेला नाही. त्यामुळे यंदाच्या 15 ऑगस्टला या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री म्हणून झेंडा कोण फडकवणार? यावरून महायुतीत गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. Aditi Tatkare

नाशिकमधील पालकमंत्रीपदावरून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि रायगडमधील पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे. पण आता राज्य सरकारने 15 ऑगस्टला झेंडावंदन करणाऱ्या मंत्र्यांची नावे जाहीर केली असून रायदगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले नाही तर मंत्री आदिती तटकरेच झेंडावंदन करणार आहेत. तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन झेंडा फडकवतील, अशी माहिती राज्य सरकारच्या परिपत्रकातून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अन्य मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने स्पष्ट केले आहे. या परिपत्रकानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड जिल्ह्यात, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यात, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहिल्यानगर जिल्ह्यात, छगन भुजबळ यांच्या हस्ते गोंदिया जिल्ह्यात तर सांगलीत चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

15 ऑगस्टला अवघे काही दिवस बाकी असताना महायुतीमधील रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी झेंडा कोण फडकावणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. रायगडमध्ये गोगावलेंच्या हस्तेच झेंडावंदन व्हावे, अशी इच्छा शिवसेना शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात आली होती. खुद्द उद्योग मंत्री उदय सामंत यांनी 15 ऑगस्टला फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांना ध्वजारोहण करण्याचा मान मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण त्यांची ही अपेक्षा अपूर्णच राहिली असून महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते 15 ऑगस्टला रायगडचे झेंडावंदन केले जाणार आहे, तशास्वरूपाचे परिपत्रक काढण्यात आले आहे. Aditi Tatkare



यावेळेसही मंत्री भरत गोगावले यांना झेंडावंदन करण्याचा मान मिळाला नसल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीचे वातावरण आहे. गेल्या चार दिवसापूर्वी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली होती. मात्र, त्यानंतरही या वादावर तोडगा निघाला नाही. पण आता सरकारने या वादावर स्वतःच तोडगा काढत तटकरे यांनाच झेंडावंदनाचा मान देण्यात आला आहे. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन झेंडावंदन करणार आहेत. या जिल्ह्यातही पालकमंत्री पदावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. या जिल्ह्यातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ असतानाही हा मान आता महाजनांना देण्यात आला आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शासकीय ध्वजारोहण समारंभात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री योगेश कदम, माधुरी मिसाळ, इंद्रनील नाईक आदींना कोणताही जिल्हा मिळालेला नाही.

जिल्हा आणि ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे

पालघर : गणेश नाईक, जळगाव : गुलाबराव पाटील, अमरावती : दादाजी भुसे, यवतमाळ : संजय राठोड, रत्नागिरी : उदय सामंत, धुळे : जयकुमार रावल, जालना : पंकजा मुंडे, नांदेड : अतुल सावे, चंद्रपूर : डॉ. अशोक उईके, सातारा : शंभुराज देसाई, मुंबई उपनगर : ॲड. आशिष शेलार, वाशिम : दत्तात्रय भरणे, लातूर : शिवेंद्रसिंह भोसले, नंदुरबार : ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूर : जयकुमार गोरे, हिंगोली : नरहरी झिरवाळ, भंडारा : संजय सावकारे, छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट, धाराशिव : प्रताप सरनाईक, बुलढाणा : मकरंद जाधव (पाटील), सिंधुदुर्ग : नितेश राणे, अकोला : आकाश फुंडकर, कोल्हापूर : प्रकाश आबिटकर, गडचिरोली : ॲड. आशिष जयस्वाल, वर्धा : डॉ. पंकज भोयर आणि परभणी : मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर.

Aditi Tatkare will unfurl the flag in Raigad while Girish Mahajan will unfurl it in Nashik.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023