विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हीव्हीपॅटसह किंवा मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅटवर घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदानाला वेळ लागणार असल्याने आयोगाने हा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. Vijay Vadettiwar
यापूर्वी विविध राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून मतांची चोरी झाल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळे आयोगाने व्हीव्हीपॅट वापरण्यास नकार दिल्याने या आरोपांना पुष्टी मिळते. त्यामुळे लोकांचा संभ्रम दूर करून निवडणुकीची पारदर्शकता राखण्यासाठी व्हीव्हीपॅट गरजेचा आहे. व्हीव्हीपॅट वापरायचा नसेल तर मतदान मतपत्रिकेवर घेणे आवश्यक असल्याचे वडेट्टीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महानगरपालिका अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हीव्हीपॅटसह किंवा मतपत्रिकेद्वारे घेतल्यास लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास बसेल. तसेच निवडणुका सुरळीत पार पडतील, असे विजय वडेट्टीवार यांनी पत्रात म्हटले आहे.
काँग्रेसने सत्ता सर्वोच्च कधीच मानली नाही, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाज घटकांना नजरेसमोर ठेवून काम केले पण भाजपा मात्र फक्त दोन उद्योगपतींसाठी सरकार चालवत आहे. सत्ता ही सामान्य माणसांसाठी असली पाहिजे. लोकांना जोडण्याचे काम करा, तुमची ओळख कामाने, कर्तृत्वाने निर्माण करा. घराघरात जा व लोकांच्या अडचणी, समस्या, प्रश्न जाणून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन काम करा. राज्यात भाजपा युतीचे लुटेरे सरकार आहे. भाजपाकडे प्रचंड सत्ता, ईडी व सीबीआय आहे. प्रचंड लुट सुरु असून ४० टक्क्यांचे कमिशन लाटले जात आहे.अस वडेट्टीवार पुण्यात काँग्रेसच्या कार्यशाळे म्हणाले.
Vijay Vadettiwar’s letter to the Election Commission
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला