विशेष प्रतिनिधी
मुंबई : सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकली असून महाराष्ट्रात आणण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. तलवार अधिकृतपणे राज्य सरकारच्या ताब्यात आल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. यासाठी परिश्रम करणाऱ्या मंत्री आशिष शेलार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. Sardar Raghuji Bhosale
आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील थोर सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारने लिलावातून जिंकली होती, लंडनहून ही शौर्याची निशाणी आता आपल्या मातीत परत येणार असून, हा महाराष्ट्राचा विजय आहे. ही तलवार म्हणजे मराठ्यांच्या शौर्याची, मुत्सद्देगिरीचे आणि वैभवाची अमूल्य निशाणी असून, अशा लिलावात पहिल्यांदाच आपण ऐतिहासिक वारसा जिंकून आणलेला आहे.लंडनहून ही शौर्याची निशाणी आता आपल्या मातीत परत येणार असून, हा महाराष्ट्राचा विजय आहे.
या ऐतिहासिक तलवारीचा लिलाव जिंकण्यापासून ते ती ताब्यात घेण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे मार्गदर्शन आणि भूमिका असलेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे परराष्ट्र मंत्रालय, लंडन येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सर्व अधिकारी यांचे मनःपूर्वक आभार! असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव असलेली, नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ही लिलावात निघाली होती. ती राज्य सरकारने 29 एप्रिल रोजी खरेदी केल्यानंतर, आज त्याचा प्रत्यक्ष ताबा राज्य सरकारकडे आला आहे.
माझे सहकारी आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लंडनमध्ये हा ताबा स्वीकारला. काही तांत्रिक कारणांमुळे ती मध्यस्थामार्फत खरेदी करावी लागली होती. पण, आता ती त्या मध्यस्थामार्फत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करीत त्यांनी ताब्यात घेतली आहे.
आता ही तलवार लवकरच महाराष्ट्रात येईल आणि त्याचा कायमस्वरुपी ताबा हा राज्य सरकारकडे असेल. छत्रपती शाहू महाराजांनी ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी राजे रघुजी भोसले यांना दिली होती. राजे रघुजी भोसले यांनी अनेक युद्धमोहीमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता. दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता.
ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. 1817 मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यात ही तलवार नेली असावी, असा जाणकरांचा अंदाज आहे. आता ही तलवार अधिकृतपणे राज्य सरकारच्या ताब्यात आल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. यासाठी परिश्रम करणाऱ्या मंत्री आशिष शेलार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
Maharashtra government wins Sardar Raghuji Bhosale’s historic sword at auction
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला