विशेष प्रतिनिधी
मुंबई : महा जन आक्रोश वगैरे काही नाही. हा त्यांच्या मनातला आक्रोश आहे. सत्ता गेली, खुर्ची गेली त्यामुळे मन मानत नाही, म्हणून मनाक्रोश चालला आहे, असा हल्लाबाेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केला.
शिवसेना ठाकरे गटाने कलंकित मंत्र्यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी साेमवारी र्माेर्चा काढला हाेता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो, मनाची चोरी करतो, त्यामुळे लोक आम्हाला मतदान करतात. उद्धव ठाकरेंनी जनादेशाची चोरी केली. उद्धव ठाकरे जनादेश चोर आहेत त्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवले. जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसे वागायचे हे आम्हाला शिकवावे यापेक्षा मोठे दुर्दैव काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत. कारण त्यांच्या चेल्या चपाट्यांनी कफन खरेदीतही चोरी केली. त्यातही पैसा कमावला. आता उद्धव ठाकरेंना कफन चोरांचे सरदार म्हणायचे का? मला अशी भाषा वापरायला आवडत नाही.
विरोधी पक्षातील लोकांचा भारतीय संविधानावर आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केला आहे, त्या निवडणूक आयोगाने यांना चार पत्रे दिली. सांगितले की, तुम्ही जे बोलत आहात ते शपथेवर सांगा. आरोप करणारे लोक का जात नाहीत? त्यांची हिंमत का होत नाही? का पुरावे देत नाहीत? रोज खोटे बोलायचे आणि पळून जायचे असे पळपुटे लोक आहेत. जो पराभव होतो आहे तो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी विरोधकांची अवस्था आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची कीव येते, तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, दिल्लीत तुमचे बाप बसले आहेत तरीही भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही काढून टाकत नाही? देवेंद्र फडणवीस यांनी काही भ्रष्टाचार केला नाही, असे गृहीत धरू. मग तुम्ही भ्रष्ट लोकांवर पांघरुण का घालता? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.
No Public Outrage, Just Power Loss Frustration”: CM Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला