Bhaskar Jadhav : ब्राम्हण समाजाबद्दल अपशब्द, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर संताप

Bhaskar Jadhav : ब्राम्हण समाजाबद्दल अपशब्द, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर संताप

Bhaskar Jadhav

विशेष प्रतिनिधी

मुंबई : गुहागरमधील ब्राम्हण समाजाबद्दल अपशब्द वापरल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर संताप व्यक्त हाेत आहे. मुंबईतील मेळाव्यात बोलताना जाधव यांनी गुहागरमधील ब्राम्हण सहाय्यक संघावर जोरदार टीका केली.  गुहागरमधील ब्राम्हण सहाय्यक संघाच्या अध्यक्षांना बेडकाची उपमा दिली हाेती. ब्राम्हण समाज आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. त्यावर भास्कर जाधव यांनी मी कोणाची माफी मागायची? आणि कशाची माफी मागावी? असा उलट सवाल केला.



सोमवारी मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले, काल मुंबईत माझी बैठक झाली. ब्राम्हण सहाय्यक संघाने गुहागरमध्ये दिलेल्या पत्राचा मी उल्लेख केला. मी असं काय पाप केलं आहे की, मी माफी मागावी. कोणाची माफी मागावी, असे ते म्हणाले. ब्राम्हण सहाय्यक संघाने मला समाजाच्या वतीने पत्र द्यावे असे मी काय केले आहे? मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. समाजाबद्दल टीका टिप्पणी केलेली नाही. समाजाबद्दल एकही अक्षर बोललो नाही. भारतीय जनता पक्षाने ब्राम्हण समाजाच्या लोकांना पुढे करुन काही कारण नसताना माझ्याविरोधात त्यांच्या मार्फत निषेधाचं पत्र लिहून घेतलं आहे. मग मी तुम्हाला का सोडायचे, कसली माफी मागायची,?

मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव म्हणाले, लढाई कितीही मोठी होऊ द्या, माझी राजकीय कारकीर्द संपली तरी चालेल पण माझ्या आईबद्दल अपशब्द मी खपवून घेणार नाही. माझ्या आईला शिव्या दिल्या तेव्हा विनय नातू टाळ्या वाजवत होते, समोरासमोर दोन हात ते करु शकत नाहीत. म्हणून मला बदनाम करुन माझे खच्चीकरण करण्याचा डाव आहे.
गुहागर तालुका ब्राम्हण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनश्याम जोशी यांच्यावर टीका करताना जाधव म्हणाले मी आज जे बोलत आहे, त्याचे परिणाम काय होतील याची मला चिंता नाही. घनश्याम जोशी यांनी पक्ष म्हणून पत्र लिहिलं असतं तर मला काही वाटलं नसतं. पण समाज म्हणून पत्र लिहिलं, याचं मला वाईट वाटलं. माझ्या विरोधात जिल्ह्यात, राज्यात कुठेही पत्र द्या, मी ते गटारात फेकून देतो.

Outrage Over Derogatory Remarks on Brahmin Community by Shiv Sena (Thackeray Faction) MLA Bhaskar Jadhav

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023