विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेसच्या नवनियुक्त 300 प्रदेश पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांची कार्यशाळा पुण्यात नुकतीच पार पडली.या कार्यशाळेत महाराष्ट्र काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावून मार्गदर्शन केलं. यात पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारीला लागा.आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवा असे सांगितले गेले. Congress
कार्यशाळा झाली पण पुण्यात काँग्रेस राहिलिये का असा प्रश्न उपस्थित होतो.त्याच कारण म्हणजे एकेकाळी पुणे जिल्ह्यावर काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, आता त्यांचा एक- एक शिलेदार निखळताना पाहायला मिळत आहेत. मागील काही काळात पुण्यातील अनेक काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम करत सत्ताधारी पक्षात प्रवेश केला.यात काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर असतील,संग्राम थोपटे, संजय जगताप असतील या शिवाय अनेक वर्षांपासून पक्षामध्ये विविध पदांवर काम करणारे पदाधिकारी असतील अशा सर्व नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडून सत्तेच्या दिशेने वाटचाल केली आहे.
त्यामुळे आता या कार्यशाळेचा किती प्रभाव पुण्यात दिसून येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याच्या एकूण राजकारणाचा विचार करता काँग्रेसला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फारच जड जातील असं बोललं जातयं.त्याचं कारणही तसंच आहे. पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरात काँग्रेसला उभारी देणारा एकही वजनदार नेता नाही. अशावेळी पुण्याची जबाबदारी पुणे जिल्हा निरीक्षक म्हणून असणाऱ्या सतेज उर्फ (बंटी) पाटील यांच्याकडे आहे.
असं असतानाही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची कोणतीच हालचाल अजून तरी सुरू झालेली दिसत नाही.त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस कश्या पद्धतीने निवडणूकीला सामोरे जाणार याची उत्सुकता लागली आहे.
कारण काँग्रेसचा मतदारही नेत्यानं प्रमाणे विखुरलेला आहे. मतदारांपुढे नेतृत्वचं नसल्याने मोठी पंचायत होणार आहे. काँग्रेसमध्ये असणारा अंतर्गत वाद हा अनेकदा चव्हाट्यावर आल्याने पक्षाप्रती मतदारही एकसंघ होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने पुढील वाटचाल करणार ?, पार पडलेल्या कार्यशाळेतून पुणे जिल्हा काँग्रेस कसा धडा घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Congress workshop held, where are the activists?
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला