विशेष प्रतिनिधी
पुणे : माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या मुलगा ऋषिराज सावंतच्या कथित अपहरणाचा तपास पोलिसांनी बंद केला आहे. ‘बी फायनल’ अहवाल न्यायालयात सादर केला आहे. चौकशीत अपहरणाची तक्रार खोटी असल्याचे समोर आले आणि ऋषिराज प्रत्यक्षात मित्रांसोबत बँकॉकमध्ये असल्याचे उघड झाले. Tanaji Sawant
१० फेब्रुवारी रोजी ऋषिराजच्या अपहरणाची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती. यामुळे पुण्यासह राज्यभर खळबळ उडाली. पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला. ऋषिराज ज्या वाहनातून प्रवास करत होता ते शोधून काढण्यात आले आणि त्याचा चालक त्याला विमानतळावर सोडून गेला असल्याचे आढळले. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. यादरम्यान जेएसपीएम विद्यापीठाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख राहुल कराळे यांनी अधिकृत तक्रार दाखल केली. तानाजी सावंत यांनी पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ मंत्र्यांशी संपर्क साधून मुलाचा शोध घेण्याची विनंती केली.
मात्र ऋषिराज मित्रांसह खासगी चार्टर्ड विमानाने पुणे विमानतळावरून बँकॉकला गेला होता. प्रकरण अपहरणाचे असल्याने हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) यंत्रणेला कळविण्यात आले आणि विमान परत वळवण्यात आले. ऋषिराज दोन मित्रांसह पुण्यात परतला. सावंत यांनी त्यानंतर स्पष्ट केले की, मुलगा बिझनेस मिटिंगसाठी गेला होता, मात्र कुटुंबाला माहिती न दिल्यामुळे गोंधळ झाला. त्यांनी पोलिसांसह पत्रकार परिषद घेऊन घटनाक्रम स्पष्ट केला.
या प्रकरणात सरकारी यंत्रणांचा गैरवापर झाल्याचा आरोपही झाला होता. पोलिसांनी त्यावेळीच हे अपहरण नसून गैरसमज झाल्याचे सांगितले होते. घटनेनंतर पाच महिन्यांनी पोलिसांनी अधिकृतपणे तपास बंद केला असून ‘बी फायनल’ अहवाल न्यायालयात दाखल केला आहे, अशी माहिती पुणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
Tanaji Sawant’s son closed, false complaint filed despite being with friends in Bangkok
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला