टॅरिफचा परिणाम होणार नाही, अमेरिकेच्या रेटिंग्स संस्थेचाच ट्रम्प यांच्या दाव्याला छेद

टॅरिफचा परिणाम होणार नाही, अमेरिकेच्या रेटिंग्स संस्थेचाच ट्रम्प यांच्या दाव्याला छेद

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर तब्बल ५० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली असली, तरी त्याचा भारताच्या आर्थिक वाढीवर काहीही नकारात्मक परिणाम होणार नाही, असा ठाम दावा अमेरिकेतील अग्रगण्य पतमानांकन संस्था ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्स’ हिने केला आहे. या संस्थेने तब्बल १८ वर्षांनंतर भारताचे सार्वभौम पतमानांकन वाढवून ‘बीबीबी’ केले आहे.

एस अँड पीच्या म्हणण्यानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत मजबूत आहे आणि देशांतर्गत बाजारपेठ तसेच पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक ही वाढीची मुख्य इंजिने आहेत. भारताची अमेरिकेला होणारी निर्यात ही देशाच्या एकूण जीडीपीच्या फक्त दोन टक्के आहे, त्यामुळे टॅरिफचा प्रत्यक्ष परिणाम अत्यल्प राहणार आहे. शिवाय, औषधनिर्मिती आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या भारताच्या प्रमुख निर्यात क्षेत्रांना टॅरिफच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

या अपग्रेडसोबतच एस अँड पीने भारताचे शॉर्ट-टर्म रेटिंग A-3 वरून A-2 केले असून, ट्रान्सफर आणि कन्व्हर्टिबिलिटी असेसमेंट बीबीबीवरून A- पर्यंत सुधारले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने याबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले की, पायाभूत सुविधा उभारणी, उत्पादन वृद्धी आणि सर्वसमावेशक आर्थिक दृष्टिकोनामुळे हे यश मिळाले आहे. ‘विकसित भारत २०४७’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी विकासाची गती कायम ठेवली जाईल, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

एस अँड पीने आपल्या ताज्या अंदाजात भारताचा २०२५ सालचा जीडीपी वाढीचा दर ६.३ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. तसेच, २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ‘लुक फॉरवर्ड इंडिया मोमेंट’ या त्यांच्या अहवालानुसार, २०३१ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ३.४ ट्रिलियन डॉलरवरून ६.७ ट्रिलियन डॉलरपर्यंत झेप घेईल आणि दरडोई उत्पन्न ४,५०० डॉलर्सपर्यंत जाईल.

याशिवाय, ‘चायना स्लोज, इंडिया ग्रोज’ या त्यांच्या विश्लेषणानुसार, २०२६ पर्यंत भारताचा जीडीपी वृद्धी दर ७ टक्के राहील, तर चीनचा दर ४.६ टक्क्यांवर येईल. त्यामुळे चीनऐवजी भारतच आशिया-प्रशांत प्रदेशाचे प्रमुख विकास इंजिन ठरेल, असा त्यांचा ठाम निष्कर्ष आहे.

एकूणच, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे काही प्रमाणात राजनैतिक तणाव निर्माण होऊ शकतो, पण भारताच्या आर्थिक घोडदौडीला त्याचा वेग कमी करता येणार नाही, हे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

Tariffs will have no impact, US ratings agency refutes Trump’s claim

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023