विशेष प्रतिनिधी
पुणे : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी बंगाल फाईल्स या चित्रपटाचा वाद अधिक चिघळला आहे. कोलकात्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणारा ट्रेलर लॉंच कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आला. यानंतर या प्रकरणाने राजकीय वादळ पेटले आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी अग्निहोत्रींवर तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले, “विवेक अग्निहोत्री नाटक करीत आहेत. चित्रपटांच्या नावाखाली ते राजकीय हेतुपुरस्सर प्रचार करीत असून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुजरात फाईल्स, यूपी फाईल्स, एमपी फाईल्स किंवा मणिपूर फाईल्स का बनवल्या नाहीत? फक्त बंगाल बदनाम करण्यासाठी आले आहेत. त्यांना राज्यातून हाकलून द्यायला हवे, पण लोकशाही असल्यामुळे ते अजून इथे आहेत.”
घोष यांनी सत्यजित राय यांचे नाव वापरल्याबद्दलही अग्निहोत्रींना खडे बोल सुनावले. “हे सत्यजित राय यांची भूमी आहे. अग्निहोत्री त्यांचा वापर करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याऐवजी त्यांनी बंगालच्या विकासावर चित्रपट करावा, जो देशासाठी आदर्श ठरला आहे,” असे त्यांनी म्हटले.
शनिवारी दुपारी लक्झरी हॉटेलमध्ये ट्रेलर लॉंच आयोजित करण्यात आला होता. सर्व तयारी पूर्ण झाली होती, चाचण्या झाल्या होत्या. मात्र शेवटच्या क्षणी हॉटेल प्रशासनाने कार्यक्रम रद्द केला.
विवेक अग्निहोत्रींनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते. ट्रेलर दाखवण्यासाठी असलेला लॅपटॉप जप्त करण्यात आला आणि जाणूनबुजून वायर कापण्यात आल्या.सर्व तयारी पूर्ण झाली होती. अचानक सांगण्यात आले की कार्यक्रम होऊ शकत नाही. स्पष्टपणे राजकीय दबाव आहे. जर हे हुकूमशाही किंवा फॅसिझम नाही, तर मग काय आहे? या राज्यात कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे, असे अग्निहोत्रींनी प्रतिक्रिया दिली.
Controversy over trailer launch of Bengal Files, Trinamool Congress opposes, alleging it is propaganda
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला