विशेष प्रतिनिधी
हिसार : प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा (Travel With Jo ) हिच्यावर पाकसाठी गुप्तहेरगिरी केल्याचा गंभीर आरोप झाला असून, तीन महिन्यांच्या तपासानंतर हिसार पोलिसांनी तब्बल २,५०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. Jyoti Malhotra
मल्होत्राला मे महिन्यात हिसारमधून अटक करण्यात आली होती. तपासात उघड झाले की, तिचा घनिष्ट संपर्क पाकिस्तान उच्चायोगातील अधिकारी एहसान-उर-रहीम याच्याशी होता. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर प्रकरणानंतर भारतातून हाकलण्यात आलेल्या रहीमच्या माध्यमातून मल्होत्रा दीर्घकाळ संवेदनशील माहिती पाठवत असल्याचा आरोप आहे.
तसेच, आरोपपत्रात तिचे संबंध आयएसआय हँडलर्स शाकीर, हसन अली आणि नासिर ढिल्लों यांच्याशी असल्याचे नमूद केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मल्होत्रा वारंवार परदेश प्रवास करत होती. गेल्या वर्षी एप्रिल–मे महिन्यात ती पाकिस्तानात गेली होती. त्यानंतर जूनमध्ये चीनला प्रवास केला आणि नंतर नेपाळातही गेली. विशेष म्हणजे करतारपूर कॉरिडॉर मार्गे पाकिस्तान दौर्यात तिने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज शरीफ यांची मुलाखत घेतली होती.
तपास पथकाच्या म्हणण्यानुसार, मल्होत्राच्या गुप्तहेरगिरीच्या हालचालींचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र, चार दिवस चाललेल्या भारत–पाक संघर्षादरम्यान तिच्याकडे थेट लष्करी गुप्त माहितीची उपलब्धता नव्हती, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
YouTuber Jyoti Malhotra charged with spying for Pakistan
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला