विशेष प्रतिनिधी
पुणे : Sharad Pawar वसंतदादा हे आम्हा लोकांचे नेते, पण ते इंदिरा काँग्रेसमध्ये होते. आम्हा तरुणांचा काँग्रेसला विरोध होता. त्यामुळेच आम्ही वसंतदादांचे सरकार घालवले अशी जाहीर कबुली शरद पवारांनी दिली.Sharad Pawar
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये शरद पवार बोलत होते. ज्या वसंतदादांचे सरकार मी पाडले, नंतर त्यांनीच भूतकाळ विसरून, गांधी-नेहरुंचे विचार पुढे नेण्यासाठी मला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला असंही शरद पवारांनी म्हटलं. त्यावेळचं राजकारण कसे होते आणि आताचे राजकारण कसे बदलत गेले याचा संदर्भ देताना शरद पवार म्हणाले, “वसंतदादा हे इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने स्वर्णसिंह काँग्रेसमध्ये होतो. पण निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू झाले. त्याला आम्हा तरुणांचा विरोध होता. नंतर आम्ही एकत्र आलो, पण आमच्या दोघांमध्ये एक अंतर होतं. त्यामुळेच आम्ही दादांचे सरकार घालवण्याचं ठरवलं आणि ते घालवलं. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो.Sharad Pawar
शरद पवार म्हणाले की, पुढे 10 वर्षांनी आम्ही सगळे एकत्र आलो. त्यावेळी मुख्यमंत्री कुणाला करायचा यासाठी बैठक झाली. त्यावेळी अनेक नावांची चर्चा झाली. पण दादांनी सांगितलं आता बाकी कोणाच्या नावाची चर्चा नाही. आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व शरदकडे द्यायचं. म्हणजे ज्या व्यक्तीचा सरकार मी पाडलं ती व्यक्ती गांधी-नेहरूंचा विचार मजबूत करण्यासाठी आम्ही काय केलं हे विसरून मोठ्या अंत:करणाने पुन्हा एकत्र येतं असं हे नेतृत्व त्या काळात काँग्रेसमध्ये होतं.
We youth were against Congress. That’s why we threw out Vasantdada’s government, Sharad Pawar admits
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला