Sharad Pawar : मोदी नेहरू यांचे नाव घेत नाही ही गोष्ट अस्वस्थ करणारी, शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता

Sharad Pawar : मोदी नेहरू यांचे नाव घेत नाही ही गोष्ट अस्वस्थ करणारी, शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता

Sharad Pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे : Sharad Pawar लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची जगात महती वाढवण्याचे काम करणाऱ्या माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेत नाही ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.Sharad Pawar

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या सहस्रचंद्र दर्शन कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 15 ऑगस्ट भाषण ऐकलं. लाल किल्ल्यावरून देशाला दृष्टी देण्याचे काम पंतप्रधान करत असतात. पण, लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदी जवाहरलाल नेहरू यांचे नाव येत नाही ही गोष्ट अव्यस्थ करणारी आहे. आयुष्याच्या उमेदीचा काळ जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिला. यावेळी त्यांनी घराचा देखील विचार केला नाही. स्वातंत्र्यानंतर देश एकसंघ ठेवण्यासाठी नेहरू यांनी नेतृत्व केले. देशाची जगात महती वाढवण्याचे काम नेहरू यांनी केले. जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी नेहरू यांनी पंचशील तत्त्वांचा विचार जगासमोर मांडला. अशा महान व्यक्तीचे नाव 15 ऑगस्टच्या दिवशी देशाच्या नेतृत्वाकडून घेण्यात आले नाही. ही एक प्रकारची चिंताजनक गोष्ट आहे. त्यामुळे या स्थितीला उत्तर देण्यासाठी गांधी-नेहरूंचे विचार सर्वदूर पोहचवले पाहिजेत, असे मत शरद पवार यांनी मांडले.Sharad Pawar

देशाचे चित्र सध्या बदलत आहे. गेले 14 दिवस झाले संसद सुरू आहे. मात्र, गेल्या 14 दिवसांत संसदेत काहीच काम झाले नाही. आम्ही जातो आणि सही करतो आणि लगेच दंगा सुरू होतो. त्यानंतर काम बंद पडते आणि आम्ही दुसऱ्या दिवशी जातो. अशी स्थिती पूर्वी नव्हती, असे सांगून शरद पवार म्हणाले, ज्या पद्धतीने संसदीय कामकाज सुरू आहे ते लोकशाहीला न पटण्यासारखे आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि इतर वरिष्ठ नेते एकत्र बसलो. आम्ही ठरवले की, रोज संसदेचे काम बंद पडते, याबाबत काहीतरी ठोस पाऊल टाकणं आवश्यक आहे. त्यातून संसदेच्या इतिहासात पहिल्यांदा 300 खासदारांनी आंदोलन केले. मात्र, आम्हा 300 लोकांना पोलिसांनी अटक करून पोलीस ठाण्यात नेले. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही आवाज उठवला आणि विरोधात सत्ताधाऱ्यांनी ही कृती केली.

It is disturbing that Modi does not mention Nehru’s name, Sharad Pawar expressed concern

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023